शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

लिपिक,शिपाईपदाचा पेपर फुटला!

By admin | Updated: April 12, 2017 01:04 IST

बाजार समिती पदभरती प्रक्रिया : परीक्षार्थींसह स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांचा आरोप!

चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिपिक व शिपाई पदासाठी ९ एप्रिल रोजी पेपर घेण्यात आला होता; परंतु या भरती प्रक्रियेच्या सर्व प्रश्न पत्रिकेवर वेळ, गुण, एकूण प्रश्न यात पेनद्वारे खाडाखोड करण्यात आली असल्याने पेपर फुटल्याचा आरोप उमेदवारांसह स्वाभिमानीने केला असून, भरती प्रक्रिया पारदर्शकपणे घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थी उमेदवार व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी १० एप्रिल रोजी केली आहे.चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिपिक व शिपाई पदासाठी ९ एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात आली आहे. भरती प्रक्रिया बाजार समिती व टेडरधारक कंपणीच्या माध्यमातून घेण्यात आली; परंतु सदर भरती प्रकियेदरम्यान केंद्र क्रमांक ३ वरील खोली क्रमांक ९ मध्ये शिपाई पदाच्या सर्व प्रश्न पत्रिकेवर वेळ, गुण, एकूण प्रश्न यावर पेनद्वारे खाडाखोड केल्याचे दिसून आल्याने या खोलीत गोंधळ झाला होता, तसेच उमेदवारांनी पेपर १५ मिनिट बंददेखील केला होता. यासंदर्भात विचारणा केली असता, लेखी तक्रार करा, आम्ही पेपर सेल तुमच्यासमोर फोडले आहे. यात आमचा काही संबंध नसल्याचे केंद्र प्रमुखांनी सांगितले, तसेच यासंदर्भात लेखी तक्रार करण्यास सांगितल्याने पेपर सुरू करण्यात आला होता; परंतु परीक्षार्थी उमेदवारांसमोर प्रश्नपत्रिकेचा सील तोडण्यात आला असला, तरी आतील सर्व प्रश्न पत्रिकेवर पेनद्वारे वेळ, एकूण गुण, एकूण प्रश्न यात खाडाखोड करण्यात आली असल्याने प्रश्नपत्रिका चाळण्यात आल्याचे स्पष्ट होते. तसेच लिपिक पदाच्या प्रश्नपत्रिकेवरील प्रश्न क्रमांक खोडून स्केच पेनने बदललेले आहे. याचा अर्थ सीलपॅक प्रश्न पत्रिका पाकिट फोडून परत पॅक केल्याचे निष्पन्न होत असल्याने तसेच प्रश्नपत्रिकेवर खाडाखोड करणे नियमाने गुन्हा आहे, तरी यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी व प्रामाणिक व गरीब कुटुंबातील व हुशार विद्यार्थी उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता सदर पदाच्या जागेसाठी नव्याने पारदर्शकपणे भरती प्रक्रिया घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थी उमेदवारांसह स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे सचिव, पणन व कृषी राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे; तसेच आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांच्याशी चर्चा करण्यात येऊन याप्रकरणी योग्य कारवाई करून उमेदवारांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानीचे नितीन राजपूत, विनायक सरनाईक, दीपक सुरडकर, भरत जोगदंडे, गोपाल ढोरे पाटील, विलास तायडे, गजानन भणगे, सतीश देशमाने, प्रवीण साळवे यांच्यासह परीक्षार्थी उमेदवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे.