शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

चिखली शहर पाणी पुरवठय़ाच्या जलवाहिनीतून पाण्याची चोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:51 IST

चिखली : शहराला १२ ते १४ दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना चिखली ते मेहकर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणार्‍या ठेकेदाराने शहर पाणी पुरवठय़ाच्या चिखली ते पेनटाकळी मार्गावरील मुख्य जलवाहिनीवरून दिवसा-ढवळय़ा पाण्याची चोरी करण्याचा महाप्रताप केला. शहराला पुरवठा होणार्‍या जलवाहिनीला जाणून बुजून लिक करून त्या पाण्याचा उपयोग रस्त्याच्या कामासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्याने न.प.पाणी पुरवठा अभियंता मनोज मधुकर शेळके यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देमहामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदाराचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शहराला १२ ते १४ दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना चिखली ते मेहकर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणार्‍या ठेकेदाराने शहर पाणी पुरवठय़ाच्या चिखली ते पेनटाकळी मार्गावरील मुख्य जलवाहिनीवरून दिवसा-ढवळय़ा पाण्याची चोरी करण्याचा महाप्रताप केला. शहराला पुरवठा होणार्‍या जलवाहिनीला जाणून बुजून लिक करून त्या पाण्याचा उपयोग रस्त्याच्या कामासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्याने न.प.पाणी पुरवठा अभियंता मनोज मधुकर शेळके यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.सद्यस्थितीत चिखली ते मेहकर या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगात आहे. हा रस्ता काँक्रीटीकरणाचा असल्याने यासाठी पाण्याची मोठय़ा प्रमाणावर गरज भासत असल्याने या महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदाराने चक्क चिखली शहरास पेनटाकळी प्रकल्पावरून होणार्‍या पाणी पुरवठय़ाची मुख्य जलवाहिनी लिक करून पाण्याची चोरी चालविली होती.  चिखली मेहकर रस्त्यावर असलेल्या मुंगसरी शिवारातील महामार्गाशेजारी ठेकेदाराने पाणीपुरवठय़ाच्या जलवाहिनीवरील एका व्हॉल्वजवळील शेतात चर खोदून पाइपलाइनवरून लिक केलेले पाणी शेतातील विहिरीसदृश खड्डय़ामध्ये जमा केले व तेथून आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर क्र.एम.एच.१५ ईएस ७८३१ ला लावलेल्या पंपाद्वारे पाण्याचा उपसा चालविला होता. हे पाणी दोन मोठय़ा टँकर ( क्रमांक  एम.एच.२१-६६७१ व  एम.एच.२१ एक्स ५१९) च्या सहाय्याने  रस्ता बांधकामासाठी वापरण्यात येत होते. विशेष म्हणजे चिखली मेहकर रस्त्याचे बांधकाम करणारे कंत्नाटदार जे.एम.म्हात्ने रा.सहकार नगर, पनवेल जि.रायगड यांनी गत २४ जानेवारी २0१८ रोजी चिखली मुख्याधिकार्‍यांना या महामार्गाच्या बांधकामासाठी दररोज सत्तर हजार लिटर पाणी देण्याबाबत अर्ज केला होता; मात्न शहरास पाण्याची कमतरता असल्यामुळे तो अर्ज नामंजूर करण्यात आला होता. दिवसा-ढवळय़ा हा गैरप्रकार सुरू होता. शहराला पाणी पुरवठा होणार्‍या ४५0 एमएम व्यासाच्या पाइपलाइनला कंत्नाटदाराने आपल्याजवळील ट्रॅक्टर व  टँकरच्या सहाय्याने मजुरांच्या मदतीने १ फेब्रुवारी पासून लिकेज करून सुमारे ३४ लाख ४0 हजार लिटर पाणी ज्याची अंदाजे किमत ६१४00 रुपये आहे. ते चोरून नेले अशा आशयाची तक्रार न.प.अभियंता शेळके यांनी ८ फेब्रुवारी रोजी चिखली पोलिसांत दाखल करून कंत्नाटदारावर भारतीय दंड संहिता कलम ३७९, ३४ व नगर परिषदा, नगर पंचायती  व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २१६ नुसार गुन्हा नोंद होऊन कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीवरून चिखलीे पोलिसांनी कारवाई करीत उपरोक्त दोन्ही पाण्याचे टँकर ताब्यात घेतले असून, वृत्त लिहेपर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणीhighwayमहामार्ग