गतिमंद मुलीशी लग्न लावून फसवणूक
By Admin | Updated: June 10, 2017 01:49 IST2017-06-10T01:49:05+5:302017-06-10T01:49:05+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील घटना; १0 जणांविरुध्द गुन्हा दाखल.

गतिमंद मुलीशी लग्न लावून फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव (जि. बुलडाणा) : गतिमंद मुलीशी लग्न लावून फसवणूक केल्याची देण्यात आलेल्या फिर्यादीवरुन खामगाव शहर पोलिसांनी १0 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहरानजीकच्या वाडी येथील रहिवासी प्रवीण अरुण जोशी (वय ३५) यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, नांदेड येथील उत्तमराव नारायणदेव जोशी व वंदना उत्तमराव जोशी यांनी त्यांच्या उमाराणी नामक गतिमंद मुलीचे लग्न माझ्यासोबत लावले. त्यांना माहिती असूनही त्यांनी त्यांची मुलगी ही उच्चशिक्षित व स्वभावाने सोज्ज्वळ असल्याचे भासविले. या प्रकरणी उत्तमराव जोशी व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सहकार्य केले. त्यांच्यासह नातेवाईकांची संगनमताने फसवणूक करुन ितचे लग्न फियार्दीसोबत लावले. ही घटना ४ डिसेंबर ते ८ जून २0१७ दरम्यान घडली. अशा आशयाच्या प्रवीण अरुण जोशी यांच्या फिर्यादीवरुन उत्तमराव नारायणदेव जोशी, वंदना उत्तमराव जोशी, सोमनाथ गणपत जोशी रा.फरांदे नगर नांदेड, मीना गोविंदराव जोशी, गोविंदराव बाबुराव जोशी, लक्ष्मीकांत गोविंदराव जोशी रा.उजना जि.लातूर, मंजूषा उमेश जोशी, उमेश जोशी, वर्षा विजय राजवाडीकर, विजय राजवाडीकर यांच्याविरुध्द शहर पोलिसांनी कलम ४२0, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.