विठू नामाच्या गजराने दुमदुमली रजत नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:51 IST2019-02-08T15:50:52+5:302019-02-08T15:51:35+5:30
खामगाव : ‘गुरूपावली’ महासोहळ्याच्या निमित्ताने विदर्भाच्या कानाकोपºयातून आलेल्या वारकºयांमुळे खामगाव शहर हे शुक्रवारी प्रतिपंढरपूर बनल्याचा प्रत्यय आला.

विठू नामाच्या गजराने दुमदुमली रजत नगरी
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ‘गुरूपावली’ महासोहळ्याच्या निमित्ताने विदर्भाच्या कानाकोपºयातून आलेल्या वारकºयांमुळे खामगाव शहर हे शुक्रवारी प्रतिपंढरपूर बनल्याचा प्रत्यय आला. कृषी उत्पन्न बाजार समितीतून सुरू झालेल्या महादिंडीत विठूनामाचा गजर करीत वारकरी भक्तीत रममान झाले होते.
दुपारी २ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीतून या दिंडीला सुरूवात झाली. त्यानंतर शहराच्या विविध मार्गावरून मार्गक्रमण करीत ही दिंडी गुरूपावली सोहळ्याच्या ठिकाणी श्रीश्री धाम शेगाव रोड येथे पोहोचली. शहराच्या विविध मार्गावर या महादिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या दिंडीचे एक टोक फरशीवर तर दुसरे टोक विकमशी चौकात होते. कृषी उत्पन्न बाजार समिती, टिळक पुतळा, महावीर चौक, फरशी, भगतसिंह चौक, अग्रसेन चौक, गांधी बगीचा, शहर पोलिस स्टेशन, बस स्टॅन्ड मार्गे ही दिंडी शेगावरोड कडे मार्गस्थ झाली. सुमारे सात हजार वारकरी आणि भाविकांचा या दिडींत सहभाग होता. आ. आकाश फुंडकर, आ. चैनसुख संचेती यांनीही दिंडीत सहभाग घेतला. दिंडीतील व्यवस्था आणि पार्कींगची जबाबदारी बजरंगदलाचे अॅड. अमोल अंधारे यांनी घेतली होती. या दिंडीत अनेक वारकºयांसोबतच महिला वारकरी आणि भाविक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. तुळशीवृंदावनधारी महिला वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. दिंडी दरम्यान चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
(प्रतिनिधी)