शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाविषयक नियमांचे पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:31 IST

लाेणार : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा आणि गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन शिवछत्र ...

लाेणार : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा आणि गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन शिवछत्र मित्र मंडळाचे नंदकिशोर मापारी यांनी केले. ते लाेणार येथे आयाेजित कार्यक्रमात बाेलत हाेते. या कार्यक्रमाचे प्रमुख पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक भारत बरडे, उपनिरीक्षक सूरज काळे हे होते.

नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

धाड : परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला हाेता. मात्र, या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.

लॉकडाऊनऐवजी पर्यायी मार्ग काढा

बुलडाणा : काेराेना रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. त्यातून मार्ग काढावा, अशी मागणी जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.

अमडापूर परिसरात जंतनाशक गाेळ्यांचे वितरण

अमडापूर : परिसरात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जंतनाशक गाेळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. शाळा बंद असल्याने घराेघरी जाऊन गाेळ्यांचे वितरण सुरू आहे. आतड्यांचा कृमी आजार हाेऊ नये यासाठी जंतनाशक गाेळ्यांचे वाटप करण्यात येते.

सरपंच निवडणुकीसाठी इच्छुकांची फिल्डिंग

माेताळा : तालुक्यातील पाच गावांच्या सरपंचपदाचे आरक्षण बदलण्यात आले आहे. आता या गावांतील इच्छुकांना सरपंच निवडणुकीची प्रतीक्षा आहे. तसेच अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. लवकरच या निवडणुका हाेणार असल्याचे संकेत आहेत.