मालवाहू वाहनाने दुचाकीवरील तिघांना चिरडले, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
By संदीप वानखेडे | Updated: October 14, 2023 23:18 IST2023-10-14T23:18:19+5:302023-10-14T23:18:27+5:30
बुलढाणा-खामगाव रस्त्यावरील पाेखरी फाट्याजवळील घटना

मालवाहू वाहनाने दुचाकीवरील तिघांना चिरडले, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
संदीप वानखडे, बुलढाणा : भादाेला गावाकडे जाणाऱ्या दुचाकीवरील तिघांना भरधाव मालवाहू वाहनाने चिरडले. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले. ही घटना बुलढाणा ते खामगाव रस्त्यावरील पाेखरी फाट्यावर १४ ऑक्टाेबर राेजी सांयकाळी घडली. बुलढाणा तालुक्यातील भादोला येथील रहिवासी शेख नईम शेख मुनशी हे आपली पत्नी व सून यांच्यासोबत बुलढाण्यात काही कामानिमित्त आले होते. काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने गावाकडे जात असताना मागून भरघाव वेगात आलेल्या आयशर वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
यात दुचाकीवरील शेख नईम शेख मुन्शी (वय ६०), पत्नी हमीदबी शेख नईम (वय ५०) व सून फिरदोस शे. नदीम (वय २४) हे तिघे चिरडले. यात दोघांचा जागेवरच, तर एकाचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ३ वर्षीय नातू शेख नमीर शेख नदीम हा फेकला गेला. त्याला किरकोळ मार लागला. घटनेनंतर आयशर वाहनचालक पळून गेला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.