शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीतील कोळशाने घेतला पेट!

By admin | Updated: April 25, 2017 00:02 IST

शेगाव: भुसावळच्या दिशेने दगडी कोळसा वाहून नेत असलेल्या मालगाडीच्या एका वॅगनमधील कोळशाने अचानक पेट घेतल्याची बाब शेगाव रेल्वे स्थानकावर लक्षात आली.

शेगाव: भुसावळच्या दिशेने दगडी कोळसा वाहून नेत असलेल्या मालगाडीच्या एका वॅगनमधील कोळशाने अचानक पेट घेतल्याची बाब शेगाव रेल्वे स्थानकावर लक्षात आली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या शेगाव अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली.नागपूर येथून दगडी कोळसा घेऊन निघालेली २२१५१३८१३७१ या क्रमांकाची मालगाडी सोमवारी दुपारी २ च्या सुमारास शेगाव रेल्वे स्थानकाजवळील लूप लाईनवर सिग्नलच्या प्रतिक्षेत उभी होती. दरम्यान, इंजिनपासून ४७ क्रमांकावर असलेल्या वॅगनमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याची बाब रेल्वे पोलीस वईतकार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ जीआरपी ठाणेदार एम.डी.परदेशी व शेगाव रेल्वे स्थानक प्रबंधक एम. एल. तुंबळे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. अधिकाऱ्यांनी सदर घटनेची माहिती भुसावळ येथील विभागीय अधिकाऱ्यांना व शेगाव अग्निशमन विभागाला दिली. तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या शेगाव अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील रेल्वे वाहतूक दिड तास बंद करण्यात आली होती. याप्रकरणी शेगाव अग्नीशमन विभागाचे कर्मचाऱ्यांसह आरपीएफचे अभिषेक दिवेकर, रेल्वे कर्मचारी आनंद कोरडे, ज्ञानेश्वर मामनकर, मालगाडीचे गार्ड टी. के.महल्ले, बबलू कुली, अय्यूबभाई कुली, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिनेश शिंदे, नगरसेवक रविंद्र रायणे, प्रवीण बोदडे, गजानन नाईकवाडे, हर्षद बाळापूरे यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)