‘समृद्धी’वर कारचे टायर फुटले!, अपघातात छत्रपती संभाजीनगरचे चौघे जखमी
By निलेश जोशी | Updated: September 22, 2023 20:14 IST2023-09-22T20:13:53+5:302023-09-22T20:14:08+5:30
नीलेश जाेशी, मलकापूर पांग्रा (जि. बुलढाणा): समृद्धी महामार्गावर कारचे टायर फूटून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने २२ सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या ...

‘समृद्धी’वर कारचे टायर फुटले!, अपघातात छत्रपती संभाजीनगरचे चौघे जखमी
नीलेश जाेशी, मलकापूर पांग्रा (जि. बुलढाणा): समृद्धी महामार्गावर कारचे टायर फूटून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने २२ सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात नागपूर कॉरिडॉरमध्ये दुसरबीड ते मेहकर दरम्यान घडला. अपघातामधील चारही जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये एमएच-०४-जीजीडी-२०१५ क्रमांकाचा चालक आफरोज खान, इब्राहीम खान, वसीम आणि शेख रसूल या चौघांचा समावेश आहे. त्यांच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिस मदत केंद्राने दिलेल्या माहितीनुसार एमएच-०४-जीजीडी-२०१५ या कारद्वारे चौघेही छत्रपती संभाजीनगर येथून मेहकरकडे जात होते.
या अपघातामध्ये चालक आफरोज खान हा गंभीर जखमी झालेला आहे. नागपूर कॉरिडॉरमध्ये चानेल क्रमांक ३०३ मध्ये हा अपघात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झाला. भरधाव वेगातील या कारचे मागील टायर फुटल्याने कार चालक आफरोज खानचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार साईड बॅरियरला धडकून कारमधील चौघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक गजानन उज्जोनकर व त्यांचे सहकारी ही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना त्वरेने मेहकर येथे उपचारासाठी हलविले. सोबतच अपघातग्रस्त वाहन बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.