कार एसटी बसवर धडकली; खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील घटना 

By अनिल गवई | Updated: July 16, 2023 12:15 IST2023-07-16T12:15:31+5:302023-07-16T12:15:50+5:30

खामगाव बस स्थानकातून निघालेली एम एच १४ एमजी ८२९३ नांदुरामार्गे नाशिककडे जात होती.

Car hits ST bus; Incident on Nandura Road in Khamgaon town | कार एसटी बसवर धडकली; खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील घटना 

कार एसटी बसवर धडकली; खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील घटना 

खामगाव: खामगाव येथून नाशिककडे जाणाऱ्या एका एसटी बसवर कार धडकली. त्यानंतर ही कार रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. ही घटना खामगाव शहरातून नांदुरा कडे जाणाऱ्या सागर वाईन बार समोर रस्त्यावर सकाळी ९:३० वाजता घडली.

याबाबत सविस्तर असे की, खामगाव बस स्थानकातून निघालेली एम एच १४ एमजी ८२९३ नांदुरामार्गे नाशिककडे जात होती. दरम्यान, खामगाव शहरातील एका वाईनबार जवळ वळण घेताना एम एच २८ बिके ३६३९या क्रमांकाची कार वळण घेताना एसटी बसवर जाऊन धडकली त्यानंतर अनियंत्रित झालेले कार रस्ता दुभाजकावर जाऊन आढळली. तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघातात कार आणि बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते.

Web Title: Car hits ST bus; Incident on Nandura Road in Khamgaon town