कार झाडावर आदळून पत्नी ठार, पती जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 16:50 IST2019-07-07T16:50:28+5:302019-07-07T16:50:35+5:30
लोणार: तालुक्यातील तांबोळा गावानजीक कार झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाला आहे.

कार झाडावर आदळून पत्नी ठार, पती जखमी
लोणार: तालुक्यातील तांबोळा गावानजीक कार झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सात जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, जखमीस त्वरेने औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
या अपघातामध्ये शिला भागवत दुधमोगरे (२८) ही महिला जागीच ठार झाली तर तिचा पती भागवत दुधमोगरे (३२) हा गंभीर जखमी झाला आहे. लोणार तालुक्यातील तांबोळा गावापासून दोन किमी अंतरावर हा अपघात झाला. यामध्ये भागवत दुधमोगरे हे एमएच-२८-एझेड-२६४५ क्रमांकाची कार घेऊन सरस्वती गावाकडून बिबी येथे जात होते. दरम्यान दुपारी तीन वाजता तांबोळा गावानजीक ही कार रस्त्या लगतच्या झाडावर आदळून अपघात झाला. त्यात शिला दुधमोगरे (२८) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती भागवत दुधमोगरे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना लगोलग औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा घडला ही बाब मात्र स्पष्ट होऊ शकली नाही. वृत्त लिहीपर्यंत पोलिसात या प्रकरणी तक्रार देण्यात आलेली नव्हती.