कार आणि दुचाकी अपघात, एक ठार, एक जखमी
By ब्रह्मानंद जाधव | Updated: June 18, 2023 21:08 IST2023-06-18T21:08:37+5:302023-06-18T21:08:49+5:30
बुलढाणा : कार आणि दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी झाल्याची घटना बुलढाणा ते अजिंठा रोडवरील गिरडा फाटा येथे ...

कार आणि दुचाकी अपघात, एक ठार, एक जखमी
बुलढाणा : कार आणि दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी झाल्याची घटना बुलढाणा ते अजिंठा रोडवरील गिरडा फाटा येथे घडली. १८ जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.
फिरोज शाहा युनूस शहा (वय २४, रा. अवघडराव सावंगी, ता. भोकरदन, जि.जालना) हे दुचाकी (क्रमांक एम.एच. २० एफ. १४२१) ने गिरडा वरून आवघडराव सावंगी येथे जात होते. दरम्यान, बुलढाणाकडून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये फिरोज शाहा युनूस शहा यांचा मृत्यू झाला. तर फिरोज शाहा यांचे वडील जखमी झाले असून त्यांना बुलढाणा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. गिरडा फाटा येथे हा अपघात झाला. या प्रकरणाचा तपास बुलढाणा ग्रामीण पोलिस करत आहेत.