Burglary in Mehkar; one lakh 88 thousand worth of gold stolen | भरदिवसा घरफोडी; एक लाख ८८ हजारांचा ऐवज लंपास 
भरदिवसा घरफोडी; एक लाख ८८ हजारांचा ऐवज लंपास 


 मेहकर :  अज्ञात चोरट्यांनी स्थानिक चनखोरे कॉलनीमधील एका घराचा कडीकोंडा तोडून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी घडली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 येथील चनखोरे कॉलनीमधील विद्या शिवशंकर चनखोरे सकाळी ११ वाजता विद्या गुरुकुल किड्स या शाळेवर गेल्या होत्या. त्यांचे पती आपल्या औषधीच्या दुकानातून साडेबारा वाजता जेवणासाठी घरी आले असता त्यांना घर आतून बंद आढळले. त्यांना घराचा कडीकोंडा तुटलेला  आढळला. त्यांनी घराच्या मागील दरवाजातून प्रवेश केला. दरम्यान, घरामध्ये असलेले  कपाट फोडून  चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार समोर आला. घरातील सोन्या, चांदीचे दागीने व रोख ३० हजार रुपये असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा माल लंपास केला. किमतीचा ऐवज  लंपास केला. शिवशंकर चनखोरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरूद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापूवीर्सुध्दा मेहकर मध्ये दिवसा चोºया झालेल्या आहेत.  (प्रतिनिधी)

Web Title: Burglary in Mehkar; one lakh 88 thousand worth of gold stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.