लाच मागणार्या वायरमनला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:37 IST2017-09-07T00:37:09+5:302017-09-07T00:37:25+5:30
बंद केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याकरिता सहा हजारांची लाच मागणार्या वायरमनला अमरावती येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी अटक करून गुन्हा दाखल केला.

लाच मागणार्या वायरमनला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : बंद केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याकरिता सहा हजारांची लाच मागणार्या वायरमनला अमरावती येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी अटक करून गुन्हा दाखल केला.
येथील वायरमन हमीदखा सत्तारखा यांनी तक्रारदारास त्यांचे वडिलांच्या नावावरील विद्युत मीटरचे थकीत बिल न देता परस्पर बंद केलेला वीज पुरवठा जोडून देण्यासाठी तसेच त्यांच्या नावावर नवीन विद्युत मीटर देण्यासाठी शासकीय शुल्क ५६५ रुपयांच्या व्यतिरिक्त सहा हजार रुपये लाचेची मागणी केली. यावर तक्रारदाराने अमरावती येथील लाचलुच पत विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर तसेच हमीदखा सत्तारखाने लाचेची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाल्याने अँन्टीकरप्शन ब्युरो अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, सुनीता नाशिककर, पोलीस उपअधीक्षक शैलेश जाधव बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात अँन्टीकरप्शनचे पोलीस निरीक्षक एस.बी. भाईक, पोहेकॉँ विष्णू नेवरे, रवींद्र लवंगे, पो.ना. संजय शेळके, पोकाँ. विजय वारुळे, विजय मेहेत्रे, जगदीश पवार यांनी लाइनमन हमीदखा सत्तारखा यास ६ सप्टेंबर रोजी अटक केली, तसेच वायरमन हमीदखा सत्तारखा याच्याविरुद्ध कलम ७, १५ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.