Buldhana ZP : विषय समिती सभापतींच्या निवडणुकीकडे लागले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 02:52 PM2020-01-10T14:52:00+5:302020-01-10T14:52:23+5:30

तांत्रिक कारणामुळे ती होऊ शकली नाही. परिणामी १० जानेवारी रोजी ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

Buldhana ZP: Subject Committee chairmen election | Buldhana ZP : विषय समिती सभापतींच्या निवडणुकीकडे लागले लक्ष

Buldhana ZP : विषय समिती सभापतींच्या निवडणुकीकडे लागले लक्ष

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आता विषय समिती सभापतीपदांच्या निवडणुकीकडे लक्ष लागले असून पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी या समिती सभापतीपदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.
मुळात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर किमान १५ दिवसांच्या आत ही विषय समिती सभापतीपदाची निवडणूक होणे क्रमप्राप्त आहे. यासंदर्भात नऊ जानेवारी रोजीच निवडणुकीची तारिख निश्चित झाली असती, मात्र तांत्रिक कारणामुळे ती होऊ शकली नाही. परिणामी १० जानेवारी रोजी ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीने अंतिमक्षणी जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या परिघातून भाजपला दूर सारत सत्ता स्थापन केली. ही सत्ता स्थापन होताना पडद्यामागे मोठ्या नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीबाबत उत्सूकता लागून राहली आहे. महाविकास आघाडीत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसकडे अध्यक्षपद व शिवसेनेकडे उपाध्यक्षपद आल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ व बांधकाम सभापतीपद येणार असल्याचे निश्चित झाले आहे. यापदासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतंर्गत मोठी रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अद्याप राजकीयस्तरावर त्याबाबत महाविकास आघाडीमध्ये अधिकृतस्तरावर चर्चा झाली नसली तरी अर्थ व बांधकाम सभापतीपद हे राष्ट्रवादीच्या कोट्यात पडणार आहे, हे निश्चित आहे. उर्वरित समत्यांमध्ये तिन्ही पक्षांना प्रत्येकी एक सभापतीपद मिळणार आहे हे महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यातच स्पष्ट झालेले आहे. आता फक्त कोणत्या सदस्याला ते दायचे आहे, हे निश्चित होणे बाकी आहे. दुसरीकडे नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्षा या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या दिल्ली येथील कार्यालयासही येत्या दोन दिवसात भेट देणार असून काँग्रेसतंर्गत बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार असलेले काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांची त्या भेट घेणार आहेत. त्यानंतरच प्रसंगी १४ जानेवारी रोजी त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

ते तीन सभापती कोण?

महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार तिन्ही पक्षांना जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येकी दोन पदे मिळणार आहेत. त्यामुळे आता कृषी व पशुसंवर्धन सभापती, महिला व बालकल्याण सभापती, समजा कल्याण सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार हा उत्सूकतेचा विषय ठरला आहे. यापैकी महिला व बालकल्याण आणि समाज कल्याण समिती सभापती महत्त्वाचे राहणार असून महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी महिलेची तर समाज कल्याण समिती सभापतीपदी अनुसुचीत जाती, जमातीमधील सदस्याची निवड करणे क्रमप्राप्त आहे. उपाध्यक्षांकडेही एका समितीचा पदभार द्यावा लागणार आहे. तो नेमको कोणता देणार आहे हे अद्याप निश्चित नाही. जिल्हा परिषदेच्या एकूण दहा विय समित्या असतात. त्यापैकी चार सभापतींची निवड होईल व अन्य दोन विषय समिती सभापतींची निवड ही जिल्हा परिषद अध्यक्षच करतात. त्यामुळे त्या दोन जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागून आहे.


पवार सहाव्या महिला अध्यक्ष
 जिल्हा परिषदेच्या ५७ वर्षाच्या इतिहासात सहाव्या महिला अध्यक्ष जिल्हा परिषदेला लाभल्या असून यामध्ये सर्वात कमी वयाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मनिषा पवार यांच्याकडे बघितल्या जाते. यापूर्वी काँग्रेसच्या नंदा कायंदे ( १९९७ ते ते १९९८), अनिता रणबावरे ( २००५ ते २००७), वर्षा वनारे (२०१२ ते २०१४), अलका खंडारे (२०१४ ते २०१७) आणि उमा तायडे (२०१७ ते २०२०) यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला होता. आता पुन्हा मनिषा पवार यांच्या रुपाने जिल्ह्यास पुन्हा महिला जिल्हा परिषद अध्यक्ष लाभल्या आहेत. गेल्या एक तपापासून महिलांचाच जिल्हा परिषद अध्यक्षपदावर वरचष्मा राहलेला आहे.

Web Title: Buldhana ZP: Subject Committee chairmen election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.