बुलडाणा जिल्हा परिषद कर्मचार्यांचे आंदोलन
By Admin | Updated: August 19, 2014 23:17 IST2014-08-19T22:36:47+5:302014-08-19T23:17:44+5:30
प्रलंबित मागण्यासाठी राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात आज १९ ऑगस्ट रोजी स्थानिक जिल्हा परिषद येथील कर्मचार्यांनी दुपारी काळ्या फिती लावून आंदोलन केले.

बुलडाणा जिल्हा परिषद कर्मचार्यांचे आंदोलन
बुलडाणा : जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात आज १९ ऑगस्ट रोजी स्थानिक जिल्हा परिषद येथील कर्मचार्यांनी दुपारी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
आंदोलनांतर जिल्६ाधकारी यांना िनिवेदन देण्यात आले. कर्मचार्यांच्या दिर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाबरोबर सामंजस्याची भुमिका घेवून प्रश्न मार्गी लावण्याचे काम संघटना करीत आहे. पंरतु शासनाने जि.प.कर्मचार्याच्या मागण्या प्रलंबित ठेवल्या आहे. यामुळे शासनाविरोधात रोष व्यक्ती करण्यासाठी आणि मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आज कर्मचार्यांनी आंदोलन केले. असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
या आंदोलनात जि.प.कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष पी.एस.जाधव, जिल्हाध्यक्ष अशोक खेडेकर, विभागीय संघटक राजेश वाईनदेशकर, अनिरुद्ध देशपांडे, विजय तांदुळकर, गजानन सावंत, शेख मकसुद, कोरडे, सी.पी.पाटील, डी.एस.जाधव, बबनराव सावळे, किशोर राजपुत, प्रशांत पवार, अनिल पवार, गणेश वाघ, विजय कुटे, संजय कासारे, व्ही.एस.मसने, शे.कासिफ, विजय हिंगे यांच्यासह जि.प.कर्मचारी सहभागी झाले होते.