Buldhana: इवल्याशा जीवाच्या पोटात निघाली चक्क दोन अर्भके !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 07:17 IST2025-02-05T07:15:24+5:302025-02-05T07:17:17+5:30

बाळाच्या पोटातही गर्भअसल्याची बाब समोर आल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी रविवारी अमरावती सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले.

Buldhana: Two babies were born in the womb of this poor soul! | Buldhana: इवल्याशा जीवाच्या पोटात निघाली चक्क दोन अर्भके !

Buldhana: इवल्याशा जीवाच्या पोटात निघाली चक्क दोन अर्भके !

 अमरावती : बुलढाणा जिल्ह्यातील एका तीन दिवसांच्या बाळाच्या पोटातून पुरुष जातीची चक्क दोन अर्भके बाहेर काढण्यात आली. मंगळवारी सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील तज्ज्ञांच्या चमूने ही जोखमीची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर बाळ सुखरूप आहे.

बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात १ फेब्रुवारीला ३२ वर्षीय महिलेची प्रसूती झाली. बाळाच्या पोटातही गर्भअसल्याची बाब समोर आल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी रविवारी अमरावती सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. दीड तासाच्या या शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या पोटातून दोन पुरुष जातीचे मृत, अर्धविकसित अर्भक काढण्यात आले.

राज्यातील पहिली, जगात ३४ वी घटना

नवजात बाळाच्या पोटात अर्भक आढळल्याची ही राज्यातील ही पहिली आणि जगातील ३४ वी घटना आहे. हा प्रकार पाच लाखांतून एक आहे. त्याला वैद्यकीय भाषेत 'फिट्स इन फिटो' म्हणतात.

'ती' दोन्ही अर्भके तीनशे ग्रॅमची

बाळाच्या पोटातून काढण्यात आलेले दोन्ही अर्भक हे पुरुष जातीचे आहेत. या अर्भकाचे डोके वगळता शरीराची वाढ काही प्रमाणात झाली होती. हे दोन्ही अर्भक बाळाच्या गर्भजलामध्ये होते. यामध्ये एका अर्भकाचे वजन २५० ग्रॅम, तर दुसरे ५० ग्रॅमचे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. शस्त्रक्रियेत बाळाच्या पोटाला एकूण १२ टाके पडले आहेत.

गर्भात गर्भ वाढणे ही दुर्मिळ घटना आहे. यापूर्वी नागपूर मेडिकलमध्ये अशी शस्त्रक्रिया झाली होती. परंतु, या बाळाच्या पोटात दोन अर्भक होते. मी पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया केली. -डॉ. उषा गजभिये, बालरोगतज्ज्ञ
 

Web Title: Buldhana: Two babies were born in the womb of this poor soul!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.