हृदयद्रावक! बहिणीला भेटून जात असताना दुचाकीला भीषण अपघात, तीन भावांचा जागीच मृत्यू
By विवेक चांदुरकर | Updated: August 9, 2023 22:50 IST2023-08-09T22:50:00+5:302023-08-09T22:50:42+5:30
Buldhana Accident News: नांदुरा बायपास वरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर ९ ऑगस्ट रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास दुचाकीने अज्ञात ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन सख्खे तर एका चुलत भावाचा घटना स्थळावरच मृत्यू झाला.

हृदयद्रावक! बहिणीला भेटून जात असताना दुचाकीला भीषण अपघात, तीन भावांचा जागीच मृत्यू
- विवेक चांदूरकर
नांदुरा- मलकापूर (बुलढाणा) : नांदुरा बायपास वरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर ९ ऑगस्ट रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास दुचाकीने अज्ञात ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन सख्खे तर एका चुलत भावाचा घटना स्थळावरच मृत्यू झाला.
मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील तिघे चुलत भाऊ अनोराबाद येथून आंबोला जात असताना एमएच २८ बीएन २७३९ क्रमाकांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये उमेश विठ्ठल कांढरकर (२३), प्रशांत किसन कांढरकर (२३), नितीन किसन कांढरकर (२६) यांचा जागीच मृत्यू झाला. किसन कांढरकर यांना दोन मुले होते. दोघांचाही या अपघातात मृत्यू झाला. मृतक तिघेही अविवाहीत होते. अपघाताची माहिती मिळतात ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, आश्विन फेरण, कृष्णा वसोकार, आनंद वावगे, अजय गवई, राजू बगाडे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी हजर झाले. अपघातग्रस्तांना रूग्णवाहिकेव्दारे त्यांच्या घरी नेण्यात आले. आमदार राजेश शेकडे यांनी घटनास`थळावर तात्काळ मदत उपलब्ध करून दिली.
बहिणीला भेटून गावी जात होते परत
मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील कंडारकर कुटुंबातील तीन चुलत भावंड बहिणीच्या भेटीसाठी गेले होते. ९ आॅगस्ट रोजी रात्री तीघे जण स्वगृही परतीच्या वाटेवर निघाले होते. मलकापूर - खामगाव राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा उड्डाणपूलानजीक ट्दुचाकीचा भिषण अपघात झाला.