बुलडाणा : मलकापूर पांग्रानजीक साडेचार लाखाचा गुटखा जप्त; दोन आरीपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:31 IST2018-02-08T13:27:10+5:302018-02-08T13:31:50+5:30
साखरखेर्डा ( जि. बुलडाणा ) : चिखली वरून मलकापूर पांग्रा येथे गुटखा घेवून येणाऱ्या वाहनाला साखरखेर्डा पोलीसांनी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ३ वाजेदरम्यान मलकापूर पांग्रानजीक पकडले.

बुलडाणा : मलकापूर पांग्रानजीक साडेचार लाखाचा गुटखा जप्त; दोन आरीपींना अटक
साखरखेर्डा ( जि. बुलडाणा ) : चिखली वरून मलकापूर पांग्रा येथे गुटखा घेवून येणाऱ्या वाहनाला साखरखेर्डा पोलीसांनी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ३ वाजेदरम्यान मलकापूर पांग्रानजीक पकडले असून, यामध्ये ४ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा व ५ लाख ५० हजार रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले आहे. गुटखा वाहतूक प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील गुरूवारी बाजार असल्याने बाहेर जिल्ह्यातील व्यापारी येथे येतात. त्यामुळे बाहेर जिल्ह्यात गुटखा पाठविण्याच्या उद्देशाने गुटखा माफीया चिखलीवरून मलकापूर पांग्रा येथे एम.एच.२८ ए.बी. ५४९९ क्रमांकाच्या वाहनाने गुटखा आणत होते. गुटखा वाहतूक होत असल्याची गोपणीय माहीती मिळाल्यावरुन पोलीसांनी सापळा रचून सकाळी तीन वाजता सदर वाहन पकडले. यामध्ये चार लाख ५० हजार रूपयांचा गुटखा व ५ लाख ५० हजार रुपयांचे वाहन असा एकूण दहा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी शे. शारुख शे . लाल आणि अमिरखा नबिखा पठाण (रा. चिखली) या दोघांना ताब्यात घेतले आहे.