Buldhana: महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवानिमित्त खामगावात मोटारसायकल रॅली
By अनिल गवई | Updated: May 10, 2024 12:02 IST2024-05-10T11:59:54+5:302024-05-10T12:02:43+5:30
Buldhana:महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी खामगाव शहरातून भव्य मोटारसायकल रॅली आणि शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत खामगाव आणि परिसरातील लिंगायत समाजबांधव मोठ्यासंखेने सहभागी झाले.

Buldhana: महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवानिमित्त खामगावात मोटारसायकल रॅली
खामगाव - महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी खामगाव शहरातून भव्य मोटारसायकल रॅली आणि शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत खामगाव आणि परिसरातील लिंगायत समाजबांधव मोठ्यासंखेने सहभागी झाले.
स्थानिक जगदंबा रोडवरील महात्मा बसवेश्वर चौकातून मोटारसायकल रॅली आणि शोभायात्रेला सकाळी ९ वाजता सुरूवात झाली. या रॅलीत अग्रभागी मोटारसायकल स्वार हाेते. तर पाठीमागे आकर्षक रथात महात्मा बसवेश्वर यांचा अर्धाकृती नव्यानेच तयार करण्यात आलेला पुतळा होता. त्यानंतर भुसावळ चौक मार्गे ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, लोकमान्य टिळक पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारत कटपीस, मेनरोड, फरशी, शहीद भगतसिंग चौक, महाराणा प्रताप पुतळा, अशी निघून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर या रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर महा रॅलीचे महात्मा गांधी बगीच्यात सभेत रूपांतर झाले.
याठिकाणी महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी लिंगायत समाजाचे अध्यक्ष अजयअप्पा माटे, ज्येष्ठ नेते ओंकारआप्पा तोडकर, बंडूआप्पा पणसकर, निखील लाटे, अमोल आवटे, प्रमोद तुपकरी, सतीशआप्पा दुडे, रामेश्वर साखरे, नितीन पणसकर, श्याम साखरे, सुरेश आवटे, सुरेश हिंगमिरे, अमोल कठाळकर, विशाल राजूरकर, सुभाष सदावर्ते, रमेश नागेश्वर, कैलास सरजने, राजू तोडकर आदींच्या उपस्थिती होती. महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व लिंगायत समाज खामगावच्यावतीने आयोजित या उपक्रमाला समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग दिला.