शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 6:20 PM

सुमारे एक हजार छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

- नीलेश जोशीबुलडाणा: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणाºया संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा सामान्य रुग्णालयात महिन्याकाठी होणाºया सुमारे एक हजार छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दुसरीकडे राज्यासह जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्त संकलनासाठी २६ ते ३० मार्च दरम्यान जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये रक्तदान शिबीरे घेण्यात येत आहे.कोरोना विषाणूमुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन पांढºया पेशांची संख्या कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांना रक्ताची गरज भासते, असे माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तसंक्रमण अधिकारी यांनी दिली. त्यामुळे रक्तदान शिबीरे घेण्यासही आता प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे. नाही म्हणायला उन्हाळ््यात रक्ताचा तसा नेहमीच तुटवडा असतो. मात्र आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व पातळ््यांवर यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या दृष्टीकोणातून ही भूमिका स्वीकारण्यात आली आहे.एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जरी विभागाच्या ८०, आॅर्थाेपिडीक्ससच्या ३० यासह प्रसुतीच्या शस्त्रक्रिया मिळून २५० च्या आसपास शस्त्रक्रिया होता. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा विचार करता महिन्याकाठी ही संख्या एक हजार शस्त्रक्रियेच्या आसपास जाते. त्यातच सध्या विषाणूजन्य वातावरण पाहता तसेही शस्त्रक्रिया करणे अडचणीचे असून शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाची प्रतिकार शक्तीही कमी होते. अशा स्थितीत त्याला कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तेही एक कारण यामागे आहे, असे डॉ. भागवत भुसारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्या शस्त्रक्रिया या इमरजन्सी नाही, त्या काही कालावधीसाठी पुढे ढकल्या जावू शकतात अशा शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस