शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यात आग; २० हेक्टर वनसंपदा जळून खाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 7:34 PM

बुलडाणा : चार तालुक्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या आणि बुलडाणा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात २५ डिसेंबरला रात्री आग लागून सुमारे २० हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली.

ठळक मुद्दे२५ डिसेंबरला रात्री बुलडाणा रेंजमधील कक्ष क्र. २७६ च्या भागात लागली होती आग फायर लाईनच्या कामाला वन्यजीव विभागाने प्राधान्याने हाती घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : चार तालुक्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या आणि बुलडाणा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात २५ डिसेंबरला रात्री आग लागून सुमारे २० हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ज्ञानगंगा अभयारण्यात आग लागण्याच्या घटनांना प्रारंभ झाला असून फायर लाईनच्या कामाला वन्यजीव विभागाने आता प्राधान्याने हाती घेणे गरजेचे झाले आहे. वनविभागाला तीन गवत कापणी यंत्रही नुकतेच मिळाले आहेत. त्यामुळे पूर्वी केवळ मनुष्य बळावर होणारी फायर लाईनची कामे आता यंत्राद्वारेही करणे शक्य होणार आहे. प्रकरणी वन्यजीव विभागाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सोमवारी सायंकाळी लागलेली ही आग रात्री उशिरापर्यंत धुमसत होती. प्रामुख्याने बुलडाणा रेंजमधील कक्ष क्रम २७६ च्या भागात ही आग लागली होती. या आगीमध्ये जवळपास २० हेक्टर वनसंपदा नष्ट झाल्याचा दावा सुत्र करती असली तरी आरएफोंच्या म्हणण्यानुसार आठ ते दहा हेक्टर क्षेत्र या आगीत नष्ठ झाल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळे नेमके किती क्षेत्र या आगीत नष्ट झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती मिळताच वन्यजीव विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने ज्ञानगंगा अभयारण्यातील रेंज कक्ष क्रमांक २७६ कडे रवाना झाले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांनी मोठ्या प्रयत्नपूर्वक आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण तोवर आगीच्या भक्ष्यस्थानी मोठ्या प्रमाणावर वनसंपदा गेली होती. बुलडाणा, मोताळा, चिखली आणि खामगाव तालुक्यांच्या सीमावर्ती भागात हे ज्ञानगंगा अभयारण्य पसरलेले आहे. शेड्यूल एचमध्ये असलेल्या बिबट्यांसह राज्यात अस्वलांच्यासाठी प्रामुख्याने हे अभयारण्य ओळखले जाते. तेलीणीची गुहा ही वन पर्यटनासाठी एक चांगले स्थळ या अभयारण्यात आहे. दरम्यान, अमरावतीचे सीसीएफ एम. एस. रेड्डी यांच्या विशेष प्रयत्नामुळे पाळीव गुरे चारणार्यांना अभयारण्यात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. याची कठोरपणे अंलबजावणी होत आहे. त्यामुळे त्यामुळे जंगलामध्ये यावर्षी गवताचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. पवन्या गवत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आले असून गुरांसह हरीण, काळवीट हे गवत प्रामुख्याने खातात. -- फायर ब्लोअर घटनास्थळी-- आगीची सुचना मिळताच वनविभागाचे फायर ब्लोर रवाना करण्यात आले होते. मात्र रात्रीची वेळ आणि वारे यामुळे आगीची व्याप्ती वाढ गेली. त्यामुळे मोठ्या कष्टानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आल्याचे काही कर्मचार्यांचे म्हणणे आहे. तोवर जवळपास २० हेक्टर क्षेत्र या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. -- आठ ते १० हेक्टरचे नुकसान-- अभयारण्यातील ज्या भागाला आग लागली त्या भागात आग आटोक्यात आणण्यात आली आहे. जवळपास आठ ते दहा हेक्टरवरील वनसंपदेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच फायर ब्लोर घटनास्थळी रवाना केले होते. (बी. आर. पवार, आरएफओ, ज्ञानगंगा अभयारण्य (वन्यजीव)) --सतर्कतेची गरज-- अभयारण्यात पाळीव गुरांना यावर्षी पूर्णत: बंदी घालण्यात आली होती. त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने अभयारण्यात पवण्या गवतासह अन्य गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे वनविभागाने फायर लाईनची कामे प्राधान्याने हाती घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीनेही सतर्क असणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यfireआग