बुलडाणा : धामणगांव धाड येथे शेतकर्याचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:06 IST2018-02-05T00:04:10+5:302018-02-05T00:06:58+5:30
धामणगांव धाड : येथील पांडुरंग देवराव सपकाळ (वय ७५) या वृद्ध शेतकर्याचा विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली.

बुलडाणा : धामणगांव धाड येथे शेतकर्याचा विहिरीत पडून मृत्यू
ठळक मुद्देतोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटनावयोवृद्ध मृत शेतकर्याचे नाव पांडुरंग देवराव सपकाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगांव धाड : येथील पांडुरंग देवराव सपकाळ (वय ७५) या वृद्ध शेतकर्याचा विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली.
पांडुरंग सपकाळ हे धामणगाव धाड शिवारातील शेतात फेरी मारण्यासाठी गेले असता विहिरीजवळ गेले होते. तेथे अचानक तोल जाऊन विहिरीत पडले. विहिरीत गाळ असल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, पत्नी, सुना व नातवंडे असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.