बुलडाणा जिल्हा : शिंदी येथील बाप-लेकाची गळफास घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 06:34 PM2018-02-26T18:34:29+5:302018-02-26T18:34:29+5:30

सिंदखेडराजा : तालुक्यातील शिंदी येथील बंगाळे कुटुंबातील बाप-लेकांनी साखरखेर्डा येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.

Buldhana District: two commit suside in shindi village | बुलडाणा जिल्हा : शिंदी येथील बाप-लेकाची गळफास घेवून आत्महत्या

बुलडाणा जिल्हा : शिंदी येथील बाप-लेकाची गळफास घेवून आत्महत्या

Next
ठळक मुद्दे२६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोघेही दोरांनी गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत दिसून आले.याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असता संतोषच्या नाकातून रक्तस्त्राव झालेला होता. लक्ष्मणने प्रथम बापाला मारुन फास लावला असावा नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


सिंदखेडराजा : तालुक्यातील शिंदी येथील बंगाळे कुटुंबातील बाप-लेकांनी साखरखेर्डा येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यापूर्वी याच घरातील एका मुलीने आणि मुलाने आत्महत्या केली होती. एकाच वर्षात एकाच घरातील चौघांची आत्महत्या झाल्याने या प्रकरणी अनेक तर्क-वितर्क वर्तविल्या जात आहेत.
शिंदी येथील संतोष नारायण बंगाळे (वय ६५) यांना एक मुलगा लक्ष्मण संतोष बंगाळे (वय ४०)  व चार मुली असून त्या विवाहित आहेत. तर लक्ष्मण बंगाळे याला एक मुलगी आणि एक मुलगा होता. लक्ष्मण दररोज घरी येवून मुलगा, मुलगी आणि पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. श्रावण महिन्यात शिंदी येथील दिंडी शेगावला जाते. त्या दिंडीत लक्ष्मण हा गेला होता. मुलगा नामे चैतन्य हा हिवरा आश्रम येथील विवेकानंद विद्या मंदिरात शिक्षण घेत होता. वडिलांनी त्याला घरी बोलावून दिंडीसोबत घेतले. दरम्यान रात्री लक्ष्मणने चैतन्यला फोन लावला, त्याच रात्री चैतन्यने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी वाच्छता नको म्हणून रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अकरावीत एसईएस ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी मुलगी सोनाली हिने वडिलासोबत भांडण झाल्याने दोन महिन्यापूर्वी गळफास लावून आत्महत्या केल्याची संशयाची सुई मात्र लक्ष्मणकडेच होती. परंतु हे प्रकरणही गावातच मिटविण्यात आले.  त्यामुळे लक्ष्मणचा स्वभाव पाहून संतोष बंगाळे यांनी मुलापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. अखेर लक्ष्मण हाच साखरखेर्डा येथे वार्ड क्रमांक ५ मध्ये शंकरवार यांच्या खोलीत राहू लागला. पती-पत्नी एकत्र राहत असताना त्यांच्यात नेहमी आपसात भांडणे होत होती. याबाबत लक्ष्मणच्या पत्नीने साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रारही दिली होती. दोन दिवसापूर्वी पुन्हा पती-पत्नीत भांडण झाले. पत्नी रागाच्या भरात माहेरी निघून गेली. तर लक्ष्मण हा शिंदीला २५ फेब्रुवारीला लग्नानिमित्त गेला. परत साखरखेर्ड्याला येताना वडील संतोष बंगाळे यांना सोबत घेवून आला. दरम्यान आज २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोघेही दोरांनी गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असता संतोषच्या नाकातून रक्तस्त्राव झालेला होता. त्यामुळे लक्ष्मणने प्रथम बापाला मारुन फास लावला असावा नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी दोघांच्याही मृतदेहाचे पंचनामे करुन शव-विच्छेदनासाठी मेहकरला पाठविले आहेत. शवविच्छेदनानंतरच या दोघांची सामूहिक आत्महत्या की हत्येनंतर आत्महत्या हे कळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
 
 

Web Title: Buldhana District: two commit suside in shindi village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.