मध्य प्रदेश परिवहनची बस आणि टीप्पर यांच्यात भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, १६ जखमी, ४ गंभीर

By सदानंद सिरसाट | Updated: April 15, 2025 11:17 IST2025-04-15T11:16:39+5:302025-04-15T11:17:19+5:30

Buldhana Accident News: खामगाव अकोला ते इंदौर या  मध्य प्रदेश परिवहनच्या बसला नांदुरानजिक आंबोडा फाटा जवळ चुकीच्या दिशेने समोरून  आलेल्या टिप्परने मंगळवारी सकाळी ७.२० वाजता धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले.  

Buldhana Accident News: 4 killed, 16 injured, 4 seriously injured in bus and tipper accident | मध्य प्रदेश परिवहनची बस आणि टीप्पर यांच्यात भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, १६ जखमी, ४ गंभीर

मध्य प्रदेश परिवहनची बस आणि टीप्पर यांच्यात भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, १६ जखमी, ४ गंभीर

बुलढाणा - खामगाव अकोला ते इंदौर या  मध्य प्रदेश परिवहनच्या बसला  नांदुरानजिक आंबोडा फाटा जवळ चुकीच्या दिशेने समोरून  आलेल्या टिप्परने मंगळवारी सकाळी ७.२० वाजता धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले.  तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. एकूण १६ जखमी झाले.  त्यापैकी ३ जण गंभीर जखमी आहेत. 

जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले.  गंभीर जखमींना अकोला येथे पाठवण्यात आले.मृतांमध्ये टिप्परचालक पातोड्या मालसिंग भैय्यड्या, प्रेमसिंग धारवे, दोघेही रा. नांगरटी, धानोरा महासिद्ध, ता. जळगाव जामोद, तसेच बळीराम कोतवाल यांच्यासह बसमधील एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. जखमींमध्ये खामगाव, अकोला, अमरावती येथील प्रवाशांचा समावेश आहे. 

 

Web Title: Buldhana Accident News: 4 killed, 16 injured, 4 seriously injured in bus and tipper accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.