Buldhana: मॉर्निंगवॉक वॉक करणाऱ्या महिलेला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले

By विवेक चांदुरकर | Updated: May 8, 2024 16:34 IST2024-05-08T16:34:24+5:302024-05-08T16:34:44+5:30

Buldhana Accident News: शहरातील ४४ वर्षीय महिला सकाळी फिरायला जात असताना रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने महिलेचा घटनास`थळीच मृत्यू झाल्याची घटना ८ मे रोजी घडली.

Buldhana: A woman on a morning walk was crushed by a sand transporter truck | Buldhana: मॉर्निंगवॉक वॉक करणाऱ्या महिलेला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले

Buldhana: मॉर्निंगवॉक वॉक करणाऱ्या महिलेला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले

- विवेक चांदूरकर 
नांदुरा - शहरातील ४४ वर्षीय महिला सकाळी फिरायला जात असताना रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने महिलेचा घटनास`थळीच मृत्यू झाल्याची घटना ८ मे रोजी घडली.

सच्चिदानंद नारायण बोचरे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीनुसार, त्यांची पत्नी वनिता बोचरे (वय ४४) सकाळी फिरायला गेल्या होत्या. एम एच २८ बीबी ४१३२ क्रमांकाच्या टिप्परचालकाने निष्काळजीपणे भरधाव वाहन चालवून वनिता बोचरे यांना चिरडले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तक्रारीवरून ट्रक ड्रायव्हर गजानन वसत्कार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.

ट्रक अपघातात एक जखमी 
एम पी ०८ जी ए ४५९९ क्रमांकाच्या ट्रकने येरळी गावाजवळ समाधान घोपे यांना ७ मे रोजी धडक दिली. यामध्ये समाधान घोपे जखमी झाले. नितीन घोपे यांचे तक्रारीवरून ट्रक ड्रायव्हर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Buldhana: A woman on a morning walk was crushed by a sand transporter truck