बुलडाणा : राजर्षी शाहु फार्मसीच्या विद्यार्थ्यांची सामान्य रुग्णालयाला भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 12:08 IST2017-12-13T12:06:35+5:302017-12-13T12:08:34+5:30

द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशनद्वारा संचालित राजर्षी शाहु कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालयातील डी.फार्म प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला नुकतीच शैक्षणिक भेट दिली. सदर भेटी दरम्यान संपूर्ण शिक्षक विद्यार्थ्यांसह उपस्थित होते.

Buldana: Visiting Rajarshi Shahu pharmacy student general hospital! | बुलडाणा : राजर्षी शाहु फार्मसीच्या विद्यार्थ्यांची सामान्य रुग्णालयाला भेट!

बुलडाणा : राजर्षी शाहु फार्मसीच्या विद्यार्थ्यांची सामान्य रुग्णालयाला भेट!

ठळक मुद्देशैक्षणिक भेटविद्यार्थ्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : स्थानिक द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशनद्वारा संचालित राजर्षी शाहु कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालयातील डी.फार्म प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला नुकतीच शैक्षणिक भेट दिली. सदर भेटी दरम्यान संपूर्ण शिक्षक विद्यार्थ्यांसह उपस्थित होते. विद्यार्थ्यांना रुग्णालयातील विविध विभागांची माहिती देणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. या भेटीमुळे फार्मसी विभागातील कामकाजाबाबत विद्यार्थ्यांना माहिती झाली. या भेटीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय कर्मचाºयांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व प्राध्यापक वृंदाना सहकार्य केले. त्यांनी केलेल्या सहकार्याबाबत व परवानगीबद्दल प्राचार्य डॉ.एस.पी.जैन यांनी आभार व्यक्त केले. येथे मिळालेल्या माहितीमुळे ज्ञानात भर पडल्याची प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दिली. 

Web Title: Buldana: Visiting Rajarshi Shahu pharmacy student general hospital!