शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

बुलडाणा : जुनीच लढत; नव्याने रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 3:02 PM

दोन्ही उमेदवार हे भाजप आणि शिवसेनेच्या तिकीटावर लढत होते तर शिवसेनेचा विद्यमान उमेदवार हा मनसेच्या तिकीटावर भाग्य आजमावत होता.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना आणि युतीतील दोन बंडखोर यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने लढत होत आहे. गेल्यावेळीही याच उमेदवारांमध्ये लढत झाली होती. फरक फक्त युतीतील दोन्ही उमेदवार हे भाजप आणि शिवसेनेच्या तिकीटावर लढत होते तर शिवसेनेचा विद्यमान उमेदवार हा मनसेच्या तिकीटावर भाग्य आजमावत होता.२०१९ च्या निवडणुकीत हेच चित्र उलटे झाले असून मनसेकडून भाग्य आजमावणारे संजय गायकवाड हे शिवसेनेच्या तंबुत आहे तर शिवसेनेकडून तीनदा आमदारकी भोगलेले विजयराज शिंदे हे वंचित बहुजन आघाडीकूडन रिंगणात उतरले आहेत. तर भाजपकडून लढलेले योगेंद्र गोडे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ हे रिंगणात उतरले आहेत.युतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये गेल्या पाच वर्षापासून अंतर्गत धुसफूस होती. माजी आमदार विजयराज शिंदे विरुद्ध खासदार तथा संपर्कप्रमुख प्रतापराव जाधव असे हे थेट दंद्व होते. या दंद्वामध्ये गेल्या पा वर्षात अनेक मानापमान नाट्य झाले. अमरावतीमधील शिवसेना उमेदवाराच्या पराभवाचेही खापर एकमेकावर फोडल्या गेले होते. त्यामुळे शिवसेना बुलडाण्यात तरी एकसंघ अशी वाटत नव्हती. खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलडाण्यातील शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवा यांच्यासाठी प्रतिष्ठा लावली होती. प्रसंगी संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा देण्यापर्यंतची त्यांची भूमिका होती, अशी चर्चा आहे. त्यापृष्ठभूमीवर वरिष्ठस्तरावर त्यांच्या शब्दाला किंमत मिळून त्यांना अपेक्षीत असलेला उमेदवार बुलडाण्यात देण्यात आला. त्यामुळे पाच पैकी तीन वेळा निवडून आलेले विजयराज शिंदे यांनी हाती बंडाचा झेंडा घेत वंचित बहुजन आघाडीची कास धरली.भाजपकडून योगेंद्र गोडे इच्छूक होते. पाच वर्षे ग्रासरूट लेव्हलवर त्यांनी काम केले. युतीत भाजपला मतदारसंघ सुटावा यासाठी ते धडपडत होते. खुद्द मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रश्नी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे राजकीय जाणकार सांगतात. मात्र शिवसेनेने बुलडाण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावल्याने शिवसेनेला ही जागा सुटली. त्यामुळे गोडे यांनीही हाती अपक्षाचा झेंडा घेत ऐकला चलोरेची भूमिका घेतली. आता त्यांना अतंर्गत स्तरावर युतीमधील तथा काँग्रेसमधील छुपे विरोधक कितपत साथ देतात यावर त्यांचे गणित अवलबून आहे. दुसरीकडे विजयराज शिंदे यांचीही अशीच स्थिती आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनाही पक्षांतर्गत विरोधकांचा सामाना करावा लागणार आहे. युतीतील बंडखोरीमुळे शिवसेनेच्या उमेदवाराला अडचण आहे तशीच काँग्रेसमधील छुपा विरोध सपकाळ यांना कितपत अडचणीत आणतो हे येणारा काळच स्पष्ट करेल.गेल्या निवडणुकीत सपकाळ हे ११ हजार ६६१ मतांनी विजयी झाले होते. त्यांना ४६ हजार ९८५ मते मिळाली होती. दुसºया क्रमांकावर त्यावेळी मनसेत असणारे आणि आता शिवसेनेकडून उमेदवार असलेले संजय गायकवाड यांना ३५ हजार ३२४ मते मिळाली होती. सध्या अपक्ष असलेले योगेंद्र गोडे यांना भाजपकडून लढतांना ३३,२३७ मते मिळाली तर ‘वंचित’कडून भाग्य आजमावरे विजयराज शिंदे यांना शिवसेनेकडून लढतांना ३२ हजार ९४६ मते मिळाली होती. त्यामुळे खºया अर्थाने बुलडाण्यात चौरंगी लढत आहे. सात आॅक्टोबरला बंडखोरांमधून कोण अर्ज मागे घेतो हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे. त्यातच एमआयएमतर्फे मोहम्मद सज्जाद हे रिंगणात उतरले असून मतविभाजन करण्यात ते कितपत यशस्वी ठरतात यावर बरिचशी गणिते अवलंबून आहे. मात्र खर्या अर्थाने बुलडाण्यात यंदा जुनीच लढत असून नव्या निकालीची प्रतीक्षा आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :buldhana-acबुलढाणाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019