बुलडाणा : पोलीस भरती जागा वाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:53 IST2018-02-16T00:38:22+5:302018-02-16T00:53:12+5:30
बुलडाणा : पोलिस भरतीची १२ हजार पदे भरण्याचे आश्वासन पूर्ण करावे, प्रत्येक जिल्ह्यात किमान २00 पदे भरावी, पोलिस शिपायांची रिक्त पदे भरावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले.

बुलडाणा : पोलीस भरती जागा वाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पोलिस भरतीची १२ हजार पदे भरण्याचे आश्वासन पूर्ण करावे, प्रत्येक जिल्ह्यात किमान २00 पदे भरावी, पोलिस शिपायांची रिक्त पदे भरावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची १२ हजार पदे भरण्याचे आश्वासन मध्यंतरी दिले होते. मात्र अद्यापही कुठलीच पदभरती करण्यात आली नाही. त्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये निरुत्साहाचे वातावरण आहे. सरकारने आश्वासनाची पुर्तता करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवार पासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातून मोठय़ा संख्येने युवक वर्ग सहभागी झाला आहे.