बुलडाणा जिल्ह्यात ८१ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:40 IST2020-11-28T17:40:37+5:302020-11-28T17:40:45+5:30
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या ही ११,०५५ झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात ८१ जण पॉझिटिव्ह
बुलडाणा: जिल्ह्यात शुक्रवारी तपासण्यात आलेल्या १,२५८ अहवालांपैकी १,१७७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या ही ११,०५५ झाली आहे. दरम्यान, यापैकी १०,५६३ बाधीतांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
दुसरीकडे प्रयोगशाळेत शुक्रवारी १,२५८ जणांचे अहवाल तपासण्यात आले. त्यात ८१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये बुलडाणा शहरातील १३, नांदुरा आठ, टाकरखेड एक, देऊळगाव राजा एक, किन्होळा एक, चिखली एक, सिंदखेड राजा ५, दुसरबीड एक, बाळसमुद्र दोन, शिवणी टाका एक, सावखेड तेजन एक, भोसा एक, खामगाव दोन, पिंपळगाव काळे एक, जळगाव जामोद दोन, शिवणी पिसा एक, किनगाव जट्टू दोन, पिंप्री खंडारे दोन, लोणार एक, मलकापूर नऊ, मोताळा तीन, बोराखेडी दोन, मेहकर ११, डोणगाव ेक, शेलगाव जहांगीर एक, शेगाव चार, जवळपा एक, आणि जळगाव खान्देश येतील दोन जणांचा समावेश आहे.
यासोबतच शुक्रवारी ५२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने खामगाव कोवीड केअर सेंटरमधून पाच, चिखली चार, देऊळगाव राजा चार, जळगाव जामोद दोन, बुलडाणा पाच, नांदुरा तीन, मोताळा नऊ, सिंदखेड राजा सहा यासह अन्य बरे झालेल्यांचा समावेश आहे.