बुलडाणा जिल्ह्यात आठ महिन्यांत ७४ महिला विकृत वासनेच्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 12:24 PM2021-09-21T12:24:23+5:302021-09-21T12:24:44+5:30

Crime News : जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ७४ महिलांवर अत्याचार झाले आहेत.

In Buldana district, 74 women fell victim to perverted lust in eight months | बुलडाणा जिल्ह्यात आठ महिन्यांत ७४ महिला विकृत वासनेच्या शिकार

बुलडाणा जिल्ह्यात आठ महिन्यांत ७४ महिला विकृत वासनेच्या शिकार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिल्ह्यातील मागील आठ महिन्यांत ७४ महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या आहेत. विशेष म्हणजे यासोबतच विनयभंग झालेल्या महिला-मुलींचीही संख्या २८६ एवढी असून, यामुळे जिल्ह्यातील महिला-मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून पाहिजे तेवढे प्रयत्न केले जातात. यासोबतच गुन्हेगारीने डोकेवर काढू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया आणि अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे हे जिल्ह्यावर कटाक्षाने नजर ठेवून आहेत. असे जरी असले तरी जिल्ह्यात महिला आणि मुलींवर होत असलेले अत्याचार चिंतेचा विषय बनत आहे. विशेष म्हणजे आता महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

७४ महिलांवर झाले अत्याचार

  जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ७४ महिलांवर अत्याचार झाले आहेत.

  यामध्ये बहुतांश प्रकरणे ही ग्रामीण भागातील असून, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक ठेवणे आता गरजेचे झालेले आहे.

  पुढील काळात याबाबत कोणती पावले उचलली जातात याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. एकीकडे पोलिसांच्या तपासाची गती वाढत असताना दुसरीकडे त्याच तुलनेत गुन्हेही घडत आहेत.

 

गतवर्षीच्या तुलनेत वाढ

  जिल्ह्यात २०२१ या वर्षातील आठ महिन्यांत ७४ महिलांवर अत्याचार झाले आहेत. तर २०२० या वर्षातील आठ महिन्यांत ही आकडेवारी ५४ एवढी होती. तेव्हा जिल्ह्यात सुरू असलेल्या वर्षाची अत्याचाराची संख्या लक्षणीय असून, महिलांच्या सुरक्षेसाठी आता सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 

२८६ विनयभंगांची नोंद

  जिल्ह्यात अत्याचाराबरोबरच विनयभंगाच्या घटनांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात आठ महिन्यांत तब्बल २८६ महिला-मुलींचे विनयभंग झाले असल्याची नोंद आहे. २०२० या वर्षात ही संख्या २७८ एवढी होती. तर तपास शंभर टक्के पूर्ण झाला होता. तो यंदा ९९ टक्के एवढा आहे.

तपास ९९ टक्के

जिल्ह्यात जरी महिलांवरील अत्याचार वाढले असले तरी दुसरीकडे मात्र, पोलिसांच्या तपासाची गतीही उल्लेखनीय आहे. कारण, झालेल्या ७४ अत्याचारापैकी ७३ प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांंना यश आले आहे. जे की २०२० या वर्षात शंभर टक्के एवढे होते.

Web Title: In Buldana district, 74 women fell victim to perverted lust in eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.