बुलडाणा जिल्ह्यात वाढले १३ हजार मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 15:01 IST2019-09-09T15:01:10+5:302019-09-09T15:01:28+5:30
लोकसभा निवडणुकीदरम्यान असलेल्या मतदारांच्या तुलनेत त्यात १३ हजार ५१८ मतदारांची वाढ झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात वाढले १३ हजार मतदार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: विधानसभा निवडणुकीची आचार संहिता येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता असतानाच ३१ आॅगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीदरम्यान असलेल्या मतदारांच्या तुलनेत त्यात १३ हजार ५१८ मतदारांची वाढ झाली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात २० लाख २५ हजार ९१७ मतदार होते. ते आता २० लाख ३९ हजार ४३५ वर पोहोचले आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघ सोडता अन्य मतदारसंघात किमान एक हजार ते तीन हजार ८०० दरम्यान मतदार वाढले आहेत तर बुलडाणा विधानसभेची एकूण मतदार संख्या ही तीन लाख चार हजार ९५१ वर पोहोचली असून सिंदखेड राजा मतदारसंघातील मतदारांची संख्या तीन लाख ११ हजार २६६ झाली आहे. मलकापूर विधानसभेमध्ये वर्तमान स्थितीत दोन लाख ६७ हजार ६६६ मतदार, चिखलीमध्ये दोन लाख ९४ हजार ७३, मेहकरमध्ये दोन लाख ९२ हजार ६७०, खामगावमध्ये दोन लाख ७९ हजार ७२८ आणि जळगाव जामोदमध्ये दोन लाख ८९ हजार ८१ मतदार संख्या झाली आहे. मलकापूरमध्ये ६९२, बुलडाण्यामध्ये एक हजार १६५, चिखलीमध्ये एक हजार ७३७, सिंदखेड राजामध्ये एक हजार ५३५, मेहकरमध्ये तीन हजार १६७, खामगावमध्ये एक हजार ३८४ आणि जळगाव जामोदमध्ये सर्वाधिक तीन हजार ८३८ मतदार वाढले आहेत.