बुलडाणा : मोताळ्यात काँग्रेसचा इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:59 IST2018-02-16T00:59:09+5:302018-02-16T00:59:21+5:30
नफेखोरीसाठी पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलेंडरचे भाव कमी केलेले नाही, दरवाढ थांबविण्यात यावी. एकप्रकारे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशातून इंधन दरवाढीच्या नावाखाली होणारी अधिकृत चोरी आहे. जनमानसात त्याच्याविरुद्ध रोष असून त्याला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोताळा येथे गुरूवारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.

बुलडाणा : मोताळ्यात काँग्रेसचा इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा (बुलडाणा): गेल्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती अत्यंत कमी झाल्या असतानाही नफेखोरीसाठी पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलेंडरचे भाव कमी केलेले नाही. त्यामुळे सर्वमान्य जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. एक प्रकारे ही जनतेची मानसिक व आर्थिक पिळवणूक केल्या जात आहे. त्यामुळे ही दरवाढ थांबविण्यात यावी. एकप्रकारे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशातून इंधन दरवाढीच्या नावाखाली होणारी अधिकृत चोरी आहे. जनमानसात त्याच्याविरुद्ध रोष असून त्याला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोताळा येथे गुरूवारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.
आमदार हर्षवर्धन सपकळा यांच्या नेतृत्त्वात तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे जेष्ठ नेते मुख्त्यारसिंग राजपुत, तालुका अध्यक्ष अनिल खाकरे, माजी जि. प. सभापती एकनाथ खर्र्चे, माजी सभापती शरदचंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य गणेशसिंह राजपूत, सभापती पती उखा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गवई, नीलेश जाधव, हमीद कुरेशी, मिलिंद अहिरे, डॉ. भरत सपकाळ, सुरेश सरोदे, संजय किनगे, प्रकाश बस्सी , नाना देशमुख, अनंत देशमुख, ईरफान पठाण, विजयसिंह राजपूत, मिलिंद जयसवाल, पवन ठाकूर, राजेश गवई, अब्दुल रफीक, सलीम ठेकेदार, इब्राहिम खान (शेरू), अरविंद पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते ६0 बैलगाड्यांसह मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.बाजार समिती पासून या मोर्चाला सुरूवात होऊन तो तहसिल कार्यालयावर धडकला. शासना विरोधात घोषणाबाजी झाली.