शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

बुलडाण्यात भरदिवसा घरफोडी; चार लाखांचा मुद्देमाल लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 1:05 AM

बुलडाणा: शहरातील सोळंकी ले- आऊटमध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील दीड लाख रुपये रोख व अडीच लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देठसे तज्ज्ञ व एसडीपीओंनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरातील सोळंकी ले- आऊटमध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील दीड लाख रुपये रोख व अडीच लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, ठसे तज्ज्ञांनी घरातील ठसे घेतले असून, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. बुलडाणा येथील श्री. शिवाजी विद्यालयामध्ये पंढरीनाथ वाघ हे कार्यरत आहेत. एमसीव्हीसीला ते शिकवतात. त्यांच्या मुलीचा ४ मे रोजी विवाह ठरला आहे. त्यानिमित्ताने ते शनिवारी बुलडाणा शहरातील एका भागात नातेवाइकाकडे गडंगनेरासाठी मुलगा, पत्नीसह गेले होते. दरम्यान, यावेळी त्यांच्या घरी कोणी नव्हते. त्यामुळे त्यांनी घराला कुलूप लावून घेतले होते.दरम्यान, दुपारची हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सोबतच घरातील कपाटाच्या लॉकरचे लॉक तोडून त्यातील आठ तोळे सोने आणि दीड लाख रुपये रोख लंपास केली. यामध्ये दोन तोळ्य़ाची पोत, सोन्याचा गोफ, तीन अंगठय़ा, कानातले पाच जोड मण्याची एक माळ असे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.दरम्यान, बुलडाणा शहरात भरदिवसा अशी धाडसी चोरी होण्याचा हा अलीकडील काळातील पहिलाच प्रकार म्हणावा लागले. त्यामुळे बुलडाणेकर सध्या चांगलेच धास्तावले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची ओरड होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हाThiefचोर