ब्रेकिंग: मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी बुलढाण्यात 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून युवकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 15:02 IST2019-10-13T15:02:09+5:302019-10-13T15:02:33+5:30
या युवकाने पुन्हा आणूया आपले सरकार हे टी-शर्ट घालून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली.

ब्रेकिंग: मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी बुलढाण्यात 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून युवकाची आत्महत्या
खामगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा वरवट बकाल व खामगाव येथे आयोजित केली आहे. या सभेपूर्वी शेगाव तालुक्यातील खातखेड येथील राजू नामदेव तलवारे या युवकाने पुन्हा आणूया आपले सरकार हे टी-शर्ट घालून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली. जळगाव जामोद तालुक्यातील वरवट बकाल येथे काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे. यापूर्वीच खातखेड येथील या युवकाने आत्महत्या केली.