महिलेचा मृतदेह सापडला वडील व मुलगा अद्यापही बेपत्ताच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 14:26 IST2018-08-23T14:22:16+5:302018-08-23T14:26:39+5:30
सेल्फी काढण्याच्या नादात मुलासह आईवडील पूर्णा नदीच्या पात्रातून वाहून गेल्याची घटना २२ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ५.३० वाजता घडली होती.

महिलेचा मृतदेह सापडला वडील व मुलगा अद्यापही बेपत्ताच!
संग्रामपूर : सेल्फी काढण्याच्या नादात मुलासह आईवडील पूर्णा नदीच्या पात्रातून वाहून गेल्याची घटना २२ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ५.३० वाजता घडली होती. या घटनेतील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बुलडाणा येथून आपत्कालीन पथक गुरुवारी पहाटे ५.३० वाजता दाखल झाले होते. चव्हाण कुटुंबातील तिघांपैकी सरिता चव्हाण यांचा मृतदेह पहुरपुर्णा नजीक सापडला आहे. उर्वरीत दोघे अद्याप सापडलेले नाहीत.
सेल्फी काढण्याच्या नादात मुलासह आईवडील पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना खिरोडानजीक २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली. खिरोडा नजीक पुलाजवळ बुलडाणा अर्बनच्या जळगाव जामोद शाखेतील कर्मचारी राजेश गुलाबसिंग चव्हाण यांच्यासह त्यांची पत्नी सारिका व मुलगा श्रवण हा याठिकाणी पूर पाहण्यासाठी थांबले होते. दरम्यान त्यांचा मुलगा श्रवण हा सेल्फी काढतांना घसरून पाण्यात पडला. त्यापाठोपाठ आई व वडील सुद्धा पाण्यात वाहून गेले होते. यापैकी सारिका चव्हाण यांचा मृतदेह पहुरपुर्णा येथे सापडला आहे. त्यांना शवविच्छेदनासाठी शेगाव येथे पाठवण्यात आला आहे. राजेश चव्हाण व श्रवणचा शोध अद्याप सुरुच आहे. खामगाव येथून अभिजीत आसोडे व टीम पुर्णा पात्रात त्यांचा शोध घेत आहे. त्यांच्यासोबत बुलडाणाचे आपतकालीन पथक सुद्धा आहे.