मलकापूर पांगरा येथे ३२ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST2021-07-25T04:28:46+5:302021-07-25T04:28:46+5:30
साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र अडोळे यांच्याहस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वस्ताद जालिंदर जाधव पैलवान, तानाजी ...

मलकापूर पांगरा येथे ३२ जणांचे रक्तदान
साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र अडोळे यांच्याहस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वस्ताद जालिंदर जाधव पैलवान, तानाजी जाधव पैलवान, किशोर काळदाते यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांमध्ये पैलवान नीलेश जाधव टायगर ग्रुप जालना, देवराज ठाकूर, अमोल राठोड, पियुष चव्हाण, अंकुश हटकर, रवी सुपेकर आदी उपस्थित होते.
काेराेना संसर्गामुळे रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. टायगर ग्रुप आयोजक सनी आराग, गोपाल केवट, जगदीश कळसाईत, आफताब शेख, अवी गणेशकर, जीवन वायाळ आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मलकापूर पांगरा बीट जमादार नारायण गीते, विशाल बनकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित हाेते.