‘किसान सन्मान’चा आणखी सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 03:57 PM2019-06-02T15:57:29+5:302019-06-02T16:00:52+5:30

मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याने जिल्ह्यातील आणखी एक लाख २६ हजार ७०७ शेतकºयांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

Benefits of 'Kisan Samman' scheme more than three lakh farmers in Buldhana | ‘किसान सन्मान’चा आणखी सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ

‘किसान सन्मान’चा आणखी सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ

Next
ठळक मुद्देपाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या ४ लाख ८० हजार शेतकºयांनाच हा लाभ मिळणार होता. आता जिल्ह्यातील ६ लाख ६ हजार ७०७ शेतकºयांना हा लाभ मिळणार आहे.

- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सरसकट सहा हजार रुपये देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याने जिल्ह्यातील आणखी एक लाख २६ हजार ७०७ शेतकºयांना योजनेचा लाभ मिळणार आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या ४ लाख ८० हजार शेतकºयांनाच हा लाभ मिळणार होता. आता जिल्ह्यातील ६ लाख ६ हजार ७०७ शेतकºयांना हा लाभ मिळणार आहे. आता सरसकट निधी मिळणार असून प्रशासकीय पातळीवरून शेतकºयांची माहिती गोळा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेची घोषणा चार महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आली होती. सुरूवातीला दोन हेक्टरपर्यंतचीच मर्यादा ठेवण्यात आली होती, त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यात दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांची संख्या ४ लाख ८० हजार ६४५ आहे. त्यासाठी वर्षाकाठी जिल्ह्याला २८८ कोटी ३७ लाख ७० हजार रुपयांची रक्कम मिळणे अपेक्षीत आहे. परंतू आता पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत सगळ्या शेतकºयांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सहा लाख सहा हजार ७०७ शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र आता किसान सन्मान योजनेच्या नियमावलींचा किती शेतकºयांना फटका बसतो, प्रत्यक्षात किती शेतकºयांच्या खात्यात सहा हजार रुपयांचा निधी जमा होतो, असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. परंतु तूर्तास या घोषणेमुळे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे. प्रशासकीय पातळीवरून सध्या शेतकºयांची माहिती गोळा करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक म्हणतात, माहिती नाही
बुलडाणा जिल्हा कृषी अधिकांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे जिल्ह्यात किती लाभार्थी आहे व नव्याने किती शेतकरी सहभागी होतील, याची विचारणा केली असता याची कुठलीच माहिती नसल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक नाईक यांनी सांगितले.


पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत सरसकट सहा हजार निधी देण्यासंदर्भात आज सकाळीच सुचना आल्या आहेत. त्यानुसार शेतकºयांची माहिती गोळा करून पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. डाटा संकलीत करण्यास वेळ लागू शकतो.
- राजेश पारनाईक,
निवासी उपजिल्हाधिकारी, बुलडाणा.

Web Title: Benefits of 'Kisan Samman' scheme more than three lakh farmers in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.