शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’च्या बेमुदत उपोषणास सुरुवात

By admin | Updated: July 14, 2017 00:50 IST

विनाटोकन तूर मोजणाऱ्यांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तूर खरेदीच्या काळात विनाटोकन तूर मोजमाप होत असल्याचा प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला होता. दरम्यान, चिखली सहकारी संस्था सहायक निबंधक यांनी याबाबत कारवाई न करता चुकीचा निर्णय दिल्याची तक्रार जिल्हा उप निबंधकाकडे करूनसुद्धा महिनाभराचा कालावधी उलटूनही कारवाई न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १३ जुलैपासून चिखली तहसीलसमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिखली नाफेड केंद्रावर २०० पोते तूर विनाटोकन मोजमाप होत असल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघड केला होता. तर सर्व घटनेचा सहायक निबंधक रूद्राक्ष यांनी पंचनामादेखील केला होता. परंतु यावर सहायक निबंधकांनी दोषींवर कारवाई न करता बनावट मालकास जप्त पोते देण्याचा निर्णय दिला असल्याचा आरोप करीत विनाटोकन तूर मोजल्याप्रकरणी चुकीचा निर्णय देणाऱ्या सहायक निबंधक यांच्यासह बनावट मालक, मूळ मालक व इतर दोषींवर कारवाई करावी, या प्रमुख मागणींसह तुरीचे चुकारे तत्काळ द्यावेत, नोंद झालेली तूर खरेदी करावी, दुबार पेरणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, सुकाणू समितीच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी, करपलेल्या पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नितीन राजपूत, विनायक सरनाईक, दीपक सुरडकर, विलास तायडे, अनिल चव्हाण, अशोक सुरडकर, राम अंभोरे, भरत जोगदंडे यांनी तहसिलसमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.