अस्वलांचे हल्ले: सुरक्षेसाठी संवेदनशील गावात वाटणार घुंगरू लावलेली काठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 15:35 IST2018-10-06T15:34:56+5:302018-10-06T15:35:29+5:30
बुलडाणा: अस्वलांच्या हल्लांचा शास्त्रोक्त अभ्यास करून अस्वल हल्ल्यांपासून शेतात जाणार्या शेतकर्यांसाठी सुरक्षेचा उपाय म्हणून घुंगरू लावलेली विशिष्ट प्रकारची काठी वनविभागाकडून जंगला लगतच्या अशा संवेदनशील गावात मर्यादीत स्वरुपात वाटप करण्यात येणार आहे.

अस्वलांचे हल्ले: सुरक्षेसाठी संवेदनशील गावात वाटणार घुंगरू लावलेली काठी
बुलडाणा: अस्वलांच्या हल्लांचा शास्त्रोक्त अभ्यास करून अस्वल हल्ल्यांपासून शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरक्षेचा उपाय म्हणून घुंगरू लावलेली विशिष्ट प्रकारची काठी वनविभागाकडून जंगला लगतच्या अशा संवेदनशील गावात मर्यादीत स्वरुपात वाटप करण्यात येणार आहे. त्यादृष्ीने जिल्हा उपवन संरक्षक कार्यालयाने पुढाकार घेतला असून आगामी काळात त्यादृष्टीने हालचाली करण्यात येणार आहेत. काठीला लोखंडी पाईप व त्यावर अनुकुचीदार अशा लोखंडी छोटेखानी खिळ््याप्रमाणे भासणारे सात ते आठ लोखंडाचे तुकडे लावलेली ही काठी असून त्याला घुंगरू बसविण्यात आलेले आहेत. रस्त्याने चालताना ही काठी जमीवर आदळत चालल्याने त्यातून येणारा घुंगराचा आवाज पाहता अस्वल तथा हिंस्त्र श्वापदे दे दूर जातात. प्रसंगी हल्ला झाल्यास ही काठी व त्यावरील वरचा लोखंडी भाग अनुकूचिदार असल्याने अस्वलांपासून रक्षा करण्यासाठी उपयुक्त असल्याचे जिल्हा उपवन संरक्षक सुरेंद्र वढाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. इंटरनॅशनल युनीयन फॉर कॉन्जरवेशन आॅफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी ही विशिष्ट प्रकारची काठी विकसीत केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम समोर येत आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात अशा प्रकारच्या काठीचा वापर झाला असून तेथे अशा हल्ल्यांचे प्रमाण कमी झाल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे हे जिल्हे जंगल व्याप्त असल्याने या भागातील शेतकरी व नागरिकही अशा हल्ल्यांबाबत सतर्क असल्याचे समोर आले आहे.
बचावासाठी निरीक्षण महत्त्वाचे
अस्वलांच्या हल्ल्यापासून बचावासाठी शेतकऱ्यांनी परिसराचे निरीक्षण करणेही महत्त्वाचे आहे. अस्वलाला झाडावर चढता येत असल्याने परिसरातील झाडांच्या खोडावर त्याच्या पंजाचे ओरखाडे स्पष्टपणे दिसून येतात. त्याचे पंजे मोठे असल्याने तो नखाच्या सहाय्याने झाडांवर ओरखाडे ओढतो. त्याचे निशान अस्वल परिसात असल्यास निश्चितपणे दिसते. सोबतच जमिनीत तो विशिष्टप्रकारे खोदतो. त्यावरूनही त्याचे अस्तित्व निदर्शनास येते. या व्यतिरिक्त उधईचे वारूळ तो खणून त्यातील किटक खात असल्याने असे वारूळही विशिष्ट प्रकारे तो खोदत असतो. या बाबीवरून त्याचे परिसरातील अस्तित्व निदर्शनास येऊ शकते. अमडापूर, किन्हीसवडत, तोरणवाडा परिसरात अशी चिन्हे दिसून आली होती, असे अभ्यासाअंती समोर आले असल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले.