बोथाच्या जंगलात अस्वल दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 14:15 IST2020-07-15T14:14:47+5:302020-07-15T14:15:23+5:30
स्त्याच्या कडेला एक अस्वल मुक्तसंचार करताना दिसून आले.

बोथाच्या जंगलात अस्वल दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : येथील वाहनधारक त्यांच्या चारचाकी वाहनांने बुलडाणा येथे जात असताना बोथा च्या जंगलात अस्वल दिसले. त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवला व तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . ग्रामसेवक संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे व कृषी सहाय्यक विक्रांत परमार हे तांच्या चारचाकी वाहनाने बुलढाणाकडे जात असताना बोथाच्या जंगलात मध्यभागी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला त्यांना एक अस्वल मुक्तसंचार करताना दिसून आले. त्यांनी तात्काळ वाहन थांबून त्याचा व्हिडिओ बनवला . तो व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. पावसाळी वातावरण व उगवलेले गवत यामुळे जंगलांमधील प्राण्यांचा मुक्त संचार असतो . सकाळी दहा वाजेदरम्यान अस्वलाचा मुक्त संचार कॅमेऱ्यांमध्ये बंद करण्याचा दुर्मिळ योग या वाटसरूंना आला आहे .( प्रतिनिधि )