रब्बी पीक कर्जासाठी बँकांची कुचराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 14:06 IST2019-12-11T14:05:53+5:302019-12-11T14:06:20+5:30
शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे निर्देशही दिले होते; मात्र जिल्हाधिकाºयांचा आदेश बँक अधिकाºयांनी गांभिर्याने घेतलेला दिसत नाही

रब्बी पीक कर्जासाठी बँकांची कुचराई
- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जिल्हयात दुुष्काळाचे सावट असतांना खासगी तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी मात्र कर्जवाटपात कुचराई केल्याचे दिसून येते.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार १० डिसेंबरपर्यंत १९७ कोटी या उद्दीष्टापैकी केवळ ५० कोटी रुपये म्हणजे जवळपास २५ टक्केच कर्ज वाटप जिल्हयातील बँकांनी केले असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील ८ तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीने तीव्र दुष्काळाचे सावट होते. यात घाटाखालील संग्रामपूर, खामगाव, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यात सर्वाधीक नुकसान झाल्याची नोंद आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी वारंवार बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यात आर्थीक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची अडचण समजून घेवून शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे निर्देशही दिले होते. मात्र जिल्हाधिकाºयांचा आदेश बँक अधिकाºयांनी गांभिर्याने घेतलेला दिसत नाही. त्यामुळेच खरिप हंगामात मिळालेल्या उद्दीष्टापैकी ३० टक्केच कर्ज वाटप झाले आहे. खरिप हंगामात सुद्धा अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहीले. शेतकरी संघटनांनी सुद्धा याबाबत पाठपुरावा केला. मात्र बँकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे यावरून दिसून येते.
आधीच शेतकºयांनी खरिपाची पेरणी करायला इकडून तिकडून कर्ज घेतले. त्यात आता गहू, हरभराचा पेरा कसा करावा हा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. याप्रकाराची दखल घेवून शेतकºयांना कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
खरिप हंगामातही शेतकºयांना साथ नाहीच!
खरिप हंगामातही खासगी तसेच राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकºयांना साथ मिळू शकली नाही. खरिप हंगाम २०१९ मध्ये जिल्ह्यातील बँकांना १७७३ कोटी रुपयाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी केवळ ४१४ कोटी रुपयेच वाटप होवू शकले. यामुळे अनेक शेतकºयांना
चालू वर्षात १७७३ कोटीचे उद्दीष्ट खरिपासाठी होते. त्यापैकी ४१४ कोटी रुपये वाटप केले आहेत. तर रब्बी हंगामात आतापर्यंत ५० कोटी रुपये शेतकºयांना वाटप केले आहेत.
- विनोद मेहेरे, जिल्हा व्यवस्थापक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया,
बुलडाणा
बँक अधिकारी सुरवातीपासून कर्ज वाटपाबाबत संवेदनशील नसल्याचे दिसून येते. अनेकदा याबाबत आम्ही आंदोलने सुद्धा केलीत. बँकांकडे पाठपुरावाही केला. मात्र तरीही दिरंगाई केली जात आहे.
- मोहन पाटील, शेतकरी नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना,बुलडाणा