बँक अधिका-याने मागितली लाच!

By Admin | Updated: June 10, 2017 01:51 IST2017-06-10T01:51:19+5:302017-06-10T01:51:19+5:30

आमसरी येथील पाच शेतक-यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली तक्रार.

Bank officials asked for bribe! | बँक अधिका-याने मागितली लाच!

बँक अधिका-याने मागितली लाच!

खामगाव: शासनाकडून प्राप्त पीक विम्याची रक्कम देण्यासाठी सिंडीकेट बँक व्यवस्थापक व बँक कृषी अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार आमसरी येथील पाच शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. सदर तक्रारीत नमूद आहे की, सन २0१६-१७ च्या पीक विमा योजनेचे पैसे बँकेत या शेतकर्‍यांच्या नावे जमा झालेले आहेत. ही रक्कम काढण्यासाठी बँक व्यवस् थापक आर.पी. रायबोर्डे व बँक कृषी अधिकारी सचिन कुलदपिके हे पैशांची मागणी करत आहेत. पैसे न दिल्यास खात्यात जमा झालेले पीक विम्याचे पैसे कर्जात कपात करण्यात येतील, अशी धमकी देतात. त्याचप्रमाणे विहीर खोलीकरण, ठिंबक, पाइपलाइन आदी कर्ज प्रकरणांसाठीही लाच मागतात, असा आरोप शेतकरी रवींद्र धुरंधर, तुकाराम धुरंधर, सुरेंद्र धुरंधर, जगदीश भोपळे, विजय हिंगणे यांनी केली आहे.

Web Title: Bank officials asked for bribe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.