शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बँकेने एकाच नावाच्या दोन ग्राहकांना दिला एकच खाते क्रमांक!

By admin | Updated: October 19, 2014 00:04 IST

खामगावात देना बँकेचा अफलातून कारभार

खामगाव (बुलडाणा): देना बँकेच्या येथील शाखेने एकाच नावाच्या दोन ग्राहकांना एकच खाते क्रमांक दिल्याचा अफलातून प्रक्रार उघडकीस आला आहे. बँकेच्या या भोंगळ कारभाराचा फटका एका खातेदाराला बसला आहे. दवाखान्यात उपचार घेण्यासाठी पैशांची गरज असल्यामुळे, हा खातेदार बँकेत पैसे काढण्यासाठी गेला असता, त्याच्याच नावाच्या व तोच खाते क्रमांक असलेल्या दुसर्‍या खातेदाराने आधीच रक्कम काढून घेतली असल्याचे लक्षात आले. तालुक्यातील विहिगाव येथील रामेश्‍वर किसन हागे (वय ५५) यांचे गाव देना बँकेच्या खामगावातील शाखेशी जोडण्यात आले आहे. रामेश्‍वर किसन हागे यांनी सदर बँकेत ७ सप्टेंबर २0१३ रोजी बचत खाते उघडले. त्या खात्यास बँकेकडून १२५७१00३६८४६ हा खाते क्रमांक देण्यात आला. त्यानंतर त्याच गावातील रामेश्‍वर किसन हागे (वय अंदाजे ३0) यांनी १७ सप्टेंबर २0१३ म्हणजे दहा दिवसानंतर खाते उघडले अस ता, त्यांनाही तोच खाते क्रमांक देण्यात आला. विशेष म्हणजे दोघांनाही ग्राहक कोड क्रमांकही एकच (१0७१२७६६८) देण्यात आला. दोन्ही खातेदारांच्या नामसाधर्म्यामुळे हा प्रकार घडल्याचे उघड आहे. सोयाबीन नुकसानभरपाईपोटी मिळणारी आर्थिक मदत बँकेत जमा होणार असल्याने, विहिगाव येथील रामेश्‍वर हागे यांनी त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक संबंधित तलाठय़ाकडे दिला. त्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली. शिवाय सुक्ष्म सिंचन योजनेचे अनुदानसुध्दा जमा झाले. एकूण १0 हजार २६ रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली होती. दरम्यान १६ ऑक्टोबर रोजी रक्तदाबाचा त्रास होत असल्याने ते खामगाव येथे उपचारासाठी आले असता, पैसे काढण्यासाठी बँकेत गेले. त्यावेळी त्यांना त्यांच्या खा त्यात केवळ ११६ रुपयेच शिल्लक असल्याचे सांगण्यात आले आणि पैसे देण्यास नकार देण्यात आला. नंतर बँकेच्या अधिकार्‍यांनी सदर प्रकाराचा शोध घेतला असता, एकच खा तेक्रमांक दोन व्यक्तींना देण्यात आल्याने सदर प्रकार घडल्याचे लक्षात आले. दरम्यान, रामेश्‍वर हागे यांनी यासंदर्भात लेखी तक्रार नोंदविली असता, सात दिवसात समाधान करण्यात येईल, असे लेखी उत्तर बँकेने दिले आणि दुसरा क्रमांक असलेले पासबुकसुध्दा दिले. रामेश्‍वर हागेंचे मात्र बँकेच्या या उत्तरामुळे समाधान झालेले नसून, बँकेच्या भोंगळ कारभारामुळे आपल्याला वेळेवर उपचार घेता आले नाहीत, असा रोष त्यांनी व्यक्त केला. तशी तक्रारही त्यांनी बँकेकडे केली आहे.