मलकापूरात बहुजन क्रांती मोर्चाचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 16:18 IST2018-06-30T16:17:28+5:302018-06-30T16:18:48+5:30
मलकापूर : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बहुजन क्रांती मोर्चाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने विविध मागण्यावरुन आज शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

मलकापूरात बहुजन क्रांती मोर्चाचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बहुजन क्रांती मोर्चाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने विविध मागण्यावरुन आज शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
वाकडी येथील प्रकरणाचा, भिमा कोरेगाव प्रकरण, जगतगुरु तुकाराम महाराजांच्या ऐतिहासीक लेणी भोवतालचे अतिक्रमण हटवावे, चौडी जामखेड धनगर समाज कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे अशा विविध मागण्यावरुन राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संजय इंगळे, विशाल वाकोडे, शेख साजीद बागवान, गोपाल गाडेकर, शाम सुरडकर, निलेश पाटील, प्रभाकर तायडे, आत्माराम सावंत, राजकुमार वानखेडे, हिम्मतराव जगताप, मंगलराव जगताप आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.
(तालुका प्रतिनिधी)