Awaiting third installment of PM's Kisan Samman Fund | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा!


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अद्यापपर्यंत केवळ ४ हजार रूपयेच जमा झाले असून तिसºया हप्त्याची शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच आहे.
विशेष करून जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी मंडळातील शेकडो शेतकºयांना अद्याप या योजनेची प्रतिक्षाच असल्याचे चित्र आहे. कर्मचाºयांच्या वेळकाढू धोरणाचा फटका शेतकºयांना बसतो आहे. शेतकºयांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरु केली.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकºयाला दरवर्षी सहा हजार रुपयांचे अनुदान तीन टप्प्यात दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात हजारो शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी मंडळातील शेकडो शेतकरी अद्याप या योजनेमार्फत मिळणाºया निधीच्या तिसºया हप्त्याच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या शेतकºयांची माहिती संग्रहीत करण्याचे फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले. शेतकºयांनी आवश्यक ती कागदपत्रे तलाठ्याकडे जमा केली. यानंतर बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर अनेक शेतकºयांच्या बँक खात्यात दोन टप्प्यातील ४ हजार रूपये रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र तिसºया टप्प्यातील २ हजार रूपये रक्कम अद्याप जमा झालेली नाही. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने ही रक्कम जमा होईल की नाही, याबाबत सांगणे अवघड आहे.
 
यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने पेरणी कशी करावी, हा प्रश्न आहे. या परिस्थितीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील रक्कम मिळाल्यास शेतकºयांना मोठा आधार होणार आहे. परंतु अद्याप ही रक्कम मिळालेली नाही.
- भागवत ठाकरे
शेतकरी, कुरणगाड खुर्द ता. जळगाव जामोद.


Web Title: Awaiting third installment of PM's Kisan Samman Fund
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.