महायुतीच्या जागावाटपाकडे लक्ष
By Admin | Updated: August 21, 2014 00:13 IST2014-08-20T22:35:55+5:302014-08-21T00:13:39+5:30
मनसे, राष्ट्रवादी, सेनाही लागली कामाला !

महायुतीच्या जागावाटपाकडे लक्ष
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात याहीवेळी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, असा तिहेरी सामना होणार असल्याने, तीनही पक्ष आपआपल्या परिने कामाला लागले आहेत. गेल्या १५ वषार्ंपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ आपल्या ताब्यात कसा येईल, यासाठी शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. दुसरीकडे शिवसेना सतत पराभूत होत असल्याने हा मतदारसंघ भाजपाला सोडण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाकडेही मतदारसंघाचे लक्ष असून, शिवसेनेचा उमेदवार कोण राहणार, याची कमालीची उत्सुकता आहे.
सिंदखेडराजा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वच ठिकाणी निर्विवाद सत्ता आहे. आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सलग चार वेळा विजय मिळविला आहे. आमदार शिंगणे यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजतरी उमेदवारी जाहीरपणे कोणी मागितली नाही; परंतु माजी आमदार तोताराम कायंदे यांनी पक्षश्रेष्ठीकडे फिल्डींग लावली आहे. डॉ.शिंगणे हे हा मतदार संघ कदापि सोडण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे तोताराम कायंदे यांचे आमदारकीचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरविण्याचे अधिकार डॉ.शिंगणे यांनाच असल्याने त्यांना डावलून उमेदवारी जाहीर होणे सध्या तरी शक्य वाटत नाही. ज्या ठिकाणी शिंगणे त्या ठिकाणी आम्ही अशीही मानसिकता मतदारांची असल्याने डॉ.शिंगणे सिंदखेडराजा सोडून दुसर्या मतदार संघात ते उभे राहतील! ही चर्चाही धुसर झाली आहे.
डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात कोणी दिसत नसले तरी ह्यछुपा वारह्ण काही असंतुष्ट करु शकतात. डबघाईस आलेल्या जिल्हा बँकेमुळे जे मतदार पोळले आहे, त्यांची नाराजी शिंगणे यांना चांगलीच भोवणार आहे. जर डॉ.शिंगणे यांनी उमेदवारी नाकारली तरच नवीन चेहरे समोर येऊ शकतात. त्यात जि.प.सदस्य दिनकरराव देशमुख हे खास विश्वासातील एक व्यक्ती आहेत. तर संतोष खांडेभराडही समोर येऊ शकतात. हा जर तरचा विषय आहे. शिवसेना पक्षाकडून दोनवेळा उमेदवारी मिळवूनही प्रचंड मतांनी पराभव स्वीकारलेले डॉ.शशिकांत खेडेकर तिसर्या टर्मसाठी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनीही प्रत्येक गावात जावून जनसंपर्क वाढविला आहे. दोनवेळा पराभव झालेल्या व्यक्तीला तिसर्यांदा उमेदवारी देऊ नये, असा पवित्रा काही जुन्या शिवसैनिकांनी घेतल्याने डॉ.खेडेकर यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. उमेदवारीच्या रिंगणात दिलीप वाघ त्याच बरोबर दादाराव खार्डे, रवींद्र पाटील यांनीही कंबर कसली आहे; पण डॉ.शशिकांत खेडेकर नको, हा सूर मोठय़ा प्रमाणात आवळल्या जात आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार जरी ठरला नसेल तरी लोकांना चालणारा उमेदवार देण्याचा पक्षाचा मानस आहे. त्यामुळे मेरिट यादी पाहिली जाणार आहे.
मनसेकडून जि.प.सदस्य विनोद वाघ हे दुसर्यांदा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांनीही मतदार संघात जनसंपर्क वारी सुरू केली आहे. शाखा स्थापन आणि संपर्क रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन मतदारांसोबत चर्चा केली आहे. राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा युवक वर्ग ही विनोद वाघ यांची जमेची बाजू आहे.