शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न,पोलिसांनी घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 05:15 IST

१०: ४० वाजता हा प्रयत्न झाल्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांना भ्रमनध्वनीवर समजल्यानंतर त्यांनी तातडीने तहसिल कार्यालय गाठले होते. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

बुलडाणा : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कापूस व सोयाबीन प्रश्नी आंदोलन चिघळलेले असतानाच शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बुलडाण्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांचे वाहन जाळण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.सुदैवानी कुठलाही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. वाहन जाळण्याचा प्रयत्न करताना तहसिल कार्यालयातील एकाने बघितल्याने हा संपुर्ण प्रकार समोर आला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोवर अज्ञात आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले होते. १०: ४० वाजता हा प्रयत्न झाल्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांना भ्रमनध्वनीवर समजल्यानंतर त्यांनी तातडीने तहसिल कार्यालय गाठले होते. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

अज्ञात व्यक्तींनी तहसिल कार्यालयात रात्री साडेदहाच्या सुमारास प्रवेश करत तहसिलदारांच्या वाहनाच्या मागील चाका जवळ ज्वलनशील द्रवाची बॉटल फोटून या वाहनास आग लावण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तहसिल कार्यालयात रात्र पाळीवर असलेल्या एकाने हा प्रकार बघीतला. त्याने आवाज करताच अज्ञात आरोपींनी त्वरित तेथून एका दुचाकीवर पलायन केल्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांनी सांगितले. या परिसरात दोन इमारतीच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आलेले असल्याने आरोपी त्यामध्ये चित्रबद्ध झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपींचा माग काढणे पोलिसांना शक्य होणार आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता. तहसिलदार रुपेश खंडारे यांनी सांगितल्यानुसार दुचाकीवर तीन व्यक्ती आल्या होत्या.

ठाणेदार प्रदीप साळुंके यांनीही आपल्या सहकाऱ्ऱ्यांसह घटनास्थळ गाठत पाहणी केली. मात्र अनुषंगीक विषयान्वये या विषयासंदर्भात माहिती देण्यात नकार दिला. अद्याप आमच्याकडे तक्रार आली नसल्याचे ते म्हणाले. तक्रार आल्यानंतर नेमके प्रकरण काय आहे, हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.दुसरीकडे शुक्रवारी रात्री सात वाजेच्या सुमारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या घरासमोर सुरू असलेल्या त्यांच्या अन्नत्याग सत्याग्रहादरम्यान काही अज्ञातांनी पोलिसांच्या वाहनासह एका रुग्णवाहिकेवर दगडफेक करीत नुकसान केले होते. त्यानंतर हा प्र्कार रात्री ११ वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालय परिसरात घडला. दरम्यान मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाट्यानजीकही एका ट्रकला आग लावण्यात आली असल्याची माहिती आहे.

आजच भरले होते डिझेलविशेष म्हणेज तहसिलदाराच्या शासकीय वाहनात १९ नोव्हेंबर रोजीच डिझेल भरण्यात आले होते. सुदैवाने या वाहनास आग लावण्याचा प्रकार वेळीच समोर आला नसता तर प्रसंगी तहसिल कार्यालय परिसरात मोठा अनर्थ घडला असला, असे तहसिलदार रुपेश खंडारे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना