जमीन हिस्स्याच्या वादात एकास पेट्रोलने पेटविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 15:57 IST2018-12-21T15:57:24+5:302018-12-21T15:57:47+5:30
मलकापूर : वडीलोपार्जित जमीन हिस्स्याच्या भावंडांतील एकास पेट्रोलने पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याची स्थानिक पारपेठ भागात १७ डिसेंबररोजी घडली. जखमीस ...

जमीन हिस्स्याच्या वादात एकास पेट्रोलने पेटविण्याचा प्रयत्न
मलकापूर : वडीलोपार्जित जमीन हिस्स्याच्या भावंडांतील एकास पेट्रोलने पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याची स्थानिक पारपेठ भागात १७ डिसेंबररोजी घडली. जखमीस जळगांव खांन्देश येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मलकापूर पोलिसांनी ७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अशपाक शे.इसाक (वय ४०) ह.मु.मास्टर कॉलनी अकबर रोड जळगाव खांदेश वडीलोपार्जित जमीन हिस्स्याच्या प्रश्नावरून मलकापूरात आले होते. १७ डिसेंबर रोजी भावंडांत वाद झाले. शिवीगाळ व धक्काबुक्कीझाली. त्यानंतर काही जणांनी शेख अशफाक यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शेख अशफाक जखमी झाला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात त्यांनंतर बुलढाण्यावरून जळगाव खानदेश येथे हलविण्यात आले. तिथे नवीपेठ जळगाव पोलिसांनी जखमीचे बयान नोंदवून घेतले. त्या ने पेट्रोल डोक्यावर टाकून पेटवल्याच नमूद अहवाल पाठवला.
त्या अनुषंगाने मलकापूर शहर पोलिसांनी शे.लतीफ शै.मुश्ताक, शेख सलीम, शेख मुस्ताक,शे.मुस्तफा शे.मुश्ताक,शे.सादीक शे.सलीम व आणखी दोन अशा ७ जणांविरुद्ध अपराध नं ४९४/१८ कलम ३०७, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि दुधाळ करीत आहेत. (तालुका प्रतिनीधी)