जुन्यावादातून घरात घुसून हल्ला, युवक गंभीर जखमी
By अनिल गवई | Updated: October 11, 2022 14:46 IST2022-10-11T14:45:43+5:302022-10-11T14:46:10+5:30
जुन्या वादातून ९-१० युवकाच्या टोळीने एका युवकावर घरात घुसून हल्ला चढविला.

जुन्यावादातून घरात घुसून हल्ला, युवक गंभीर जखमी
खामगाव: जुन्या वादातून ९-१० युवकाच्या टोळीने एका युवकावर घरात घुसून हल्ला चढविला. यात एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री ११:३० वाजता दरम्यान शहरातील चांदमारी येथे घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्नांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
चांदमारी येथील २२ वर्षीय गणेश लोखंडे सोमवारी रात्री घरात होता. दरम्यान, जुन्या वादातून परिसरातीलच विजय कांबळे, शुभम कांबळे, सत्यम कांबळे आणि इतर पाच ते सहा जणांनी गणेशच्या घरात घुसून हल्ला चढविला. शिवीगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी पाईपने हल्ला चढवून जखमी केले, अशी तक्रार गणेश लोखंडचे मामा अंबादास श्रीराम पवार (३५, चांदमारी, खामगाव) यांनी शहर पोलिसांत दिली.
पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून शहर पोलिसांनी उपरोक्त आरोपी विरोधात भादंवि कलम ३०७, ४५२, ३२४, १४३,१४८, १४९, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.