शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

प्राणघातक हल्ला प्रकरण: नगर पालिका कर्मचारी मोहन अहीर यास अमरावतीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 1:58 PM

Khamgaon crime news : आठवाडी बाजारातील राजेंद्र इंगळे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी नगर पालिका कर्मचारी मोहन अहीर यास अमरावतीतून अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: आठवडी बाजारातील भंगार व्यावसायिक राजेंद्र इंगळे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपी तथा नगर पालिकेचा कर्मचारी आनंदमोहन अहीर यास शनिवारी शहर पोलिसांनी अमरावती येथून अटक केली. घटनेनंतर तब्बल अडीच महिन्यांनी मुख्य आरोपी आनंदमोहन अहीर आणि त्याच्या आदित्य नामक मुलास अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक नगर पालिका हद्दीतील आणि आठवडी बाजारातील दुकानाच्या जागेसाठी पैशांची मागणी करून दबावतंत्राचा अंवलंब करीत नगरपालिका कर्मचारी आनंदमोहन अहीर याच्यासोबतच १५ जणांनी संगनमत, कट रचून भंगार व्यावसायिक राजेंद्र नामदेव इंगळे यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.  यात आठवडी बाजारातील भंगार व्यावसायिक राजेंद्र, गुलाब, निलेश आणि अभय इंगळे यांचा समावेश होता. याप्रकरणी राजेंद्र इंगळे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस स्टेशनमध्ये  भादंवि कलम ३०२,३२५, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ अन्वये नगर पालिका कर्मचारी आनंद मोहन अहीर याच्यासोबत १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल सव्वादोन महिने फरार असलेल्या आनंदमोहन अहीर आणि त्याच्या मुलांच्या मागावर पोलीस होते. दरम्यान, शनिवारी सापळा रचल्यानंतर शहर पोलिसांच्या एका पथकाने आनंदमोहन अहीर याच्यासोबतच त्याचा मुलगा आदित्य याला बडनेरा येथील जुन्यावस्तीतील एका घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी मुख्यसुत्रधारासह ७ आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.

चौकट...एका पथकाला चकवा, एका पथकाच्या हाती लागला अहीर०आरोपी मोहनअहीर आणि त्याच्या मुलांच्या शोधार्थ शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांनी आरोपी आनंदमोहन अहीर याच्याशोधार्थ एपीआय इंगळे आणि गौरव सराग यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार केली होती. यातील एका पथकाला गत काही दिवसांपासून अहीर चकवा देत होता. मात्र,  माहितीच्या आधारे सापळा रचून एपीआय इंगळे, अमरदीप ठाकूर, प्रफुल्ल टेकाडे, युवराज शेळके यांच्या पथकाने अहीरला बडनेरा येथून ताब्यात घेतले.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी